×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | माझी बायको होशील का? 13 वर्षाच्या मुलीसाठी 14 वर्षाच्या...

Pune Crime | माझी बायको होशील का? 13 वर्षाच्या मुलीसाठी 14 वर्षाच्या मुलाचे इंस्टाग्राम स्टेटस; हडपसर परिसरातील नामांकित शाळेतील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून याचा विपरीत परिणाम लहान मुलांवर होताना पाहायला मिळत आहे. कॉलेज शाळा परिसरातील रोडरोमियोंना पाहून शाळकरी मुलं ही बिनधास्तपणे मुलींना प्रपोज करायला घाबरत नाही. असाच एक प्रकार (Pune Crime) पुण्यातील हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत घडला आहे. शाळेतील एका 14 वर्षाच्या मुलाने स्वत:च्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्याच शाळेतील 13 वर्षाच्या मुलीचा फोटो ठेऊन माझी बायको होशील का? असे स्टेटस ठेवले.

 

या गोष्टीचा गंभीर विचार करुन मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शाळकरी मुलावर पॉक्सो अॅक्ट अंतर्गत तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा दोघेही हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत शिकतात.
तसेच ते एकाच ठिकाणी राहतात. मात्र, मागील काही दिवसांपासून मुलगा पीडित मुलीचा पाठलाग करत होता.
मैत्री करावी यासाठी तिला धमकावत होता.
माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा उचलून घेऊन जाईल अशी धमकीच त्याने मुलीला दिली होती. मात्र मुलीने याकडे दुर्लक्ष केले.

 

मुलगी दुर्लक्ष करत असल्याचे पाहून आरोपी मुलाने तिचा फोटो काढून माझी बायको होशील का? असं स्टेटस इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवलं होतं.
त्यानंतर मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत मुलाविरुद्ध तक्रार दिली.
पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | pune hadapsar police registered pocso case against school students in pune after instagram status will you marry me

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Assembly Elections 2022-2023 | सन 2022-23 मध्ये तब्बल 11 राज्यांमध्ये निवडणुका, जाणून घ्या इलेक्शन जिंकण्यासाठीचे मोदींचे मिशन

Pune News | विकासाच्या अनुषंगाने वक्फ मालमत्तांच्या सुयोग्य वापराविषयी मुस्लिम समुदाय करणार विचारमंथन

Sania Mirza-Varun Dhawan | वरूण धवनने सांगितला सानिया मिर्झाशी झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा

Must Read
Related News