×
Homeताज्या बातम्याVinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे...

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत

बुलढाणा: पोलीसनामा ऑनलाइन – चिखलीला शनिवार 26 नोव्हेंबरला शेतकरी संवाद मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार आहेत. तसेच या मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिली. ते बुलढाण्यात बोलत होते. यावेळी विनायक राऊतांनी (Vinayak Raut) शिंदे गटावर देखील टीका केली आहे.

शिंदे सरकारने सध्या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालवली आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी, बागायतदार आणि सर्वांना फटका बसला आहे. पण त्यांना कोणत्याही प्रकारची मदत शिंदे सरकारने केली नाही. त्यांनी फक्त घोषणा केल्या आहेत. पैसे कोणालाही दिले गेले नाहीत. कृषिपंपांना देखील वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे चिखलीचा मेळावा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, असे यावेळी विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्यावर देखील भाष्य केले. संजय राठोड यांनी संजय राऊत यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावर राऊत म्हणाले, अशा घाणारड्या औलादींच्या लोकांवर मी काही बोलणार नाही. मी त्यांना जास्त किंमत देत नाही.

भगतसिंह कोश्यारी सारखा कुजक्या मेंदूचा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला मिळाला,
ही भारतीय जनता पक्षाची देणगी आहे. राज्यपाल कोश्यारींनी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि
शिवाजी महाराज यांचा नेहमीच अपमान केला आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवदी यांनी देखील शिवाजी
महाराजांचा अपमान केला आहे. त्यामुळे सतत महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान करुन भाजप आपले खरे
दात दाखवित आहे. सावरकरांच्या अपमानावर आम्ही नाराज आहोत. त्यावर आमची भूमिका उद्धव ठाकरेंनी
मांडली आहे, असे यावेळी विनायक राऊत म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेत आम्हाला न्याय मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.
त्यानंतर हे सरकार पडेल, असे यावेळी राऊत म्हणाले. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आले, तर आनंद आहे.
आगामी काळात शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले, तर राज्यातील राजकारण सुधारु शकेल,
असे देखील यावेळी राऊत म्हणाले.

Web Title :- Vinayak Raut | Shinde Fadnavis government is making a cruel joke of the farmers of Maharashtra; Uddhav Thackeray will hold farmers dialogue meeting – Vinayak Raut

CM Eknath Shinde Group | शिवसेनेचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात जाणार?

Pune Rickshaw Strike | बाईक टॅक्सी सेवेविरोधात पुण्यात रिक्षाचालक करणार बेमुदत बंद; ‘बघतोय रिक्षावाला संघटने’च्या आवाहनाला इतर रिक्षा संघटनांचा पाठिंबा

Must Read
Related News