अमेरिकेन लोकशाहीतील काळा दिवस ! Donald Trump समर्थकांकडून अमेरिकन संसद ताब्यात घेण्याचा प्रयत्न, गोळीबारात एक महिला ठार

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकाल अद्याप डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या समर्थकांना मान्य झालेला नाही़. डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळ ( Violence ) घातला आहे. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गोंधळ ( Violence ) घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ काढून टाकला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली शपथ पूर्ण करावी, घटनेचे रक्षण करावे आणि समर्थकांचे आंदोलन थांबवावे, अस आवाहन राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडलेले ज्यो बायडन यांनी केले आहे.

निवडणुकीच्या निकालाबाबत अमेरिकेच्या संसदेच्या बोलावलेल्या बैठकीपूर्वी ट्रम्प समर्थकांची गर्दी व्हाईट हाऊस आणि अमेरिकन कॅपिटल इमारतीच्या बाहेर जमा झाले आहे. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगमध्येही गोंधळ घातला आहे.यावेळी पोलीस आणि समर्थकांमध्ये बाचाबाची झाली आहे.या वेळी झालेल्या हिंसाचारात एका महिलेचा गोळीबारात मृत्यु झाला आहे.तर या हिंसाचारात अनेक अधिकारी जखमी झाले आहेत, असे वॉशिंग्टन डीसी पोलीस प्रमुखांनी सांगितले आहे.

ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ हटविल्यानंतर फेसबुकनेही हा व्हिडिओ डिलिट केला आहे. कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित कले होते. त्यामुळे आम्ही ट्रम्प यांचा व्हिडिओ हटविला आहे. कारण ट्रम्प यांचा व्हिडिओ हिंसाचार कमी होण्याऐवजी ते प्रोत्साहन देत होता, असे फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंटीग्रिटी गाय रोसेन यांनी म्हटले आहे.