जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनूनही Elon Musk यांना पडला नाही फरक ! ट्विट वाचून लोक हैराण

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –  जगातील श्रीमंताच्या यादीत एलन मस्क (Elon Musk) यांचे नाव नंबर एकवर पोहचले आहे. मात्र, त्यांना या गोष्टीने काहीच फरक पडलेला नाही. सामान्यपणे लोक यशाची एक पायरी चढल्यानंतर थोडा आराम किंवा स्वत:ला थोडा वेळ देण्याबाबत विचार करतात. उलट ते यानंतर आपल्या कामाची गती वाढवण्याचा विचार करत आहेत. त्यांचा प्लॅन पुन्हा कामावर परतण्याचा आहे. त्यांचा हा हार्डवर्किंग अ‍ॅटिट्यूड ट्विटमधून स्पष्ट दिसत आहे.

अमेरिकन मीडियाने गुरुवारी माहिती दिली की, टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलन मस्क यांनी इतिहास रचला आहे. ते अमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांना पाठीमागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सवर जगातील 500 श्रीमंतांमध्ये पहिल्या नंबरवर पोहचले आहेत. गुरुवारी टेस्ला यांच्या शेयरमध्ये झालेल्या 4.8 टक्के वाढीने त्यांना या ठिकाणावर आणून उभे केले आहे.

यापूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बेजोस होते. त्यांनी ऑक्टोबर 2017 पासून या स्थानावर आपली पकड मजबूत ठेवली होती. मात्र, ताज्या स्थितीने संपूर्ण चित्र बदलले आहे. आता मस्क यांच्याकडे बेजोस यांच्या तुलनेत 1.5 बिलियन डॉलर जास्त संपत्ती आहे. त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या जात आहेत. यापैकी एक प्रोफाइल ’Tesla Owners of Silicon Valley’ नावाने आहे.

या प्रोफाइलवरून पोस्ट करण्यात आली की, एलन मस्क आता 190 बिलियन डॉलरच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. यावर मस्क यांनी उत्तर दिले ’कित अजब आहे ना.’ तर, एका अन्य ट्विटमध्ये त्यांनी आपल्या पुढील प्लॅनचे संकेत दिले. त्यांनी लिहिले ’ठीक आहे, पुन्हा कामावर परतूया.’ त्यांच्या या प्रतिक्रियेने सोशल मीडिया यूजर्सचे लक्ष वेधले आहे.