Video : ‘त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता’ वर TikTok रोनित अश्रानं लगावला तडका !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   रसोडे में कौन था या डायलॉगवर रॅप साँग करणारा म्युझिक प्रोड्युसर यशराज मुखाते (Yashraj Mukhate) सध्या सोशल मीडियावर स्टार झाला आहे. त्यानं केलेलं क्रिएशन बनवताच सोशलवर व्हायरल होताना दिसत असतात. अलीकडेच त्यानं शहनाज गिल (Shehnaaz Kaur Gill) च्या एका डायलॉगवर म्युझिक व्हिडीओ बनवला होता जो खूप व्हायरल झाला होता. यानंतर यशराजच्या याच म्युझिक डायलॉगवर टिकटॉक स्टार रोनित अश्रा (Ronit Ashra) नं तडका लावला आहे. बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सारा अली खान आणि अनन्या पांडे यांची नकल केल्यानंतर आता रोनितनं पंजाबची कॅटरीना शहनाज गिलची नकल केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर जोरदार व्हायरल होत आहे.

काय होत यशराजच्या व्हिडीओत ?

व्हिडीओत शहनाज गिल दिसत होती. यात ती बोलत आहे की, क्या करू मैं मर जाऊ. त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता. यावेळी ती खूपच उदास आणि दुखी दिसून आली हीच क्लीप घेऊन यशराजनं छान एडिटींग केलं होतं.छान म्युझिक आणि डायलॉग अ‍ॅड केले आहेत. शहनाजचा तो सीन त्यानं वापरला आहे तो बिग बॉस 13 मधील आहे.

आता याच म्युझिकवर रोनित अश्रानं सेम शहनाजची नकल केली आहे. त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडताना दिसत आहे. रोतिनं त्याच्या इंस्टावरून हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यात शहनाजला टॅगही केलं आहे.

रोनितचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोनितची अ‍ॅक्टींग सर्वांना आवडताना दिसत आहे. काहींनी हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे.