रेस जिंकण्यासाठी चक्क जॉकीला चावला घोडा (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घोड्याच्या शर्यतीमध्ये घोड्यावर बसून जो व्यक्ती त्याला ताब्यात ठेवत असतो त्याला जॉकी म्हटले जाते. त्यामुळे घोड्यांवर नियंत्रण ठेवून आपल्या घोड्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रत्येक जॉकीचा प्रयत्न असतो. मात्र तुम्ही कधी प्रतिस्पर्धी घोडा एख्याद्या जॉकीला चावताना पहिला आहेत का ?नाही ना,

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून यामध्ये घोडा आपल्या प्रतिस्पर्धी जॉकीला चावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. या व्हिडिओत आपल्याला दिसते कि, एका घोड्याने प्रतिस्पर्धी घोडा रेसमध्ये पुढे असल्याने त्याने त्या घोड्यावरील जॉकीला चावण्याचा प्रयत्न देखील केला. हि घटना पॅरिसमधील मेसन रेसकोर्सवरील असून घोड्याचे नाव पालोम्बा असून त्याच्या जॉकीचे नाव जेवियर बर्ट्रास असे आहे. जेवियर बर्ट्रास याने सांगितल्यानुसार, प्रतिस्पर्धी घोड्याने चावा घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मला यामध्ये कोणतीही जखम झाली नाही.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक त्याच्यावर विविध प्रतिक्रिया देखील देत आहेत.

You might also like