Virender Sehwag On Pakistan Cricket Team | वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर म्हणाला – पाकिस्तान जिंदाभाग…!

नवी दिल्ली : Virender Sehwag On Pakistan Cricket Team | आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये गुरुवारी श्रीलंका न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला. यामुळे न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरीतील दावा मजबूत केला आहे. दुसरीकडे श्रीलंकाप्रमाणे पाकिस्तान संघही उपांत्य फेरीच्या शर्यतीमधून बाहेर गेला आहे. यामुळे टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आपला आनंद एक्स या सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत पाकची खिल्ली उडवली आहे. (Virender Sehwag On Pakistan Cricket Team)

वीरेंद्र सेहवागने एक्सवर एक फोटो पोस्ट केला असून फोटोमध्ये बाय बाय पाकिस्तान असे लिहिले आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, पाकिस्तान जिंदाभाग! घरी परतण्यासाठी सुरक्षित उड्डाण करा. (Virender Sehwag On Pakistan Cricket Team)

यानंतर वीरेंद्र सेहवागने तेच ट्विट रिट्विट करत पुन्हा पाकिस्तान आणि श्रीलंकेला टोमणा मारला आहे की, पाकिस्तानची खास गोष्ट म्हणजे पाकिस्तान ज्या संघाला सपोर्ट करतो, तो संघ पाकिस्तानसारखा खेळू लागतो. त्याने या पोस्टसोबत हसणारा इमोजी शेअर केला आणि शेवटी सॉरी श्रीलंका असेही लिहिले आहे. वीरेंद्र सेहवागचे हे ट्विट व्हायरल झाले आहे.

गुरूवारी रात्री झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेवर ५ गडी राखून मोठ्या फरकाने विजय मिळवला.
यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे. कारण, न्यूझीलंडने मोठ्या फरकाने विजय नोंदवला नसता,
तर पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी थोडी फार अशा होती.

मात्र, आता पाकिस्तानचा स्पर्धेतील पुढील प्रवास अशक्य आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीत जाण्यासाठी इंग्लंडविरुद्ध
२८७ धावांनी विजय मिळवावा लागेल आणि ६ षटकांत विजय नोंदवावा लागेल. हे जवळपास अशक्य आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील सहवर्धन समूहाने सियाचीनमधील जवानांसाठी पाठवल्या ५०० गरम टोप्या, देशसेवेचा अनोखा उपक्रम

Devendra Fadnavis On Muralidhar Mohol Birthday | वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनीच साजरा व्हावा : देवेंद्र फडणवीस

Samvidhan Samman Daud In Pune | भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘संविधान सन्मान दौड 2023’ चे आयोजन

Chandrakant Patil Visit Bajirao Peshwa Statue | बाजीराव पेशव्यांचा इतिहास तरुण पीढीला प्रेरणादायी – चंद्रकांत पाटील