वीरेंद्र सेहवागची तूफान फलंदाजी, केवळ 20 चेंडूत ठोकले अर्धशतक आणि ‘इंडिया’ला मिळवून दिला 10 विकेटने विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट टीमचा माजी धडाकेबाज सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवागने इंडिया लीजेंड्सकडून फलंदाजी करत रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी-20 2021 च्या तुलनेत बांगलादेश लीजेंड्सच्या विरूद्ध केवळ 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. इतकेच नव्हे सेहवागने सचिनसोबत पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी करत इंडिया लीजेंड्सला 10 विकेटने मोठा विजय मिळवून दिला.

वीरेंद्र सेहवागने केवळ 20 चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले आणि या दरम्यान त्याने 3 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याने आपले अर्धशतक सुद्धा षटकार मारून पूर्ण केले. सेहवागने डावाची सुरुवात धमाकेदार केली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 19 धावा ठोकल्या. पहिली ओव्हर मो. रफीकने टाकली होती आणि सेहवागने त्याच्या ओव्हरमध्ये तीन चौकार आणि एक षटकार लगावला. यानंतर सुद्धा सेहवागची बॅट थांबली नाही आणि तो सतत मोठे फटके मारत राहिला.

सेहवागने या मॅचमध्ये 35 चेंडूवर 5 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 80 धावा केल्या, त्याचा स्ट्राइक रेट 228.57 चा होता. तर सचिन तेंडुलकरने 26 चेंडूवर 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 33 धावांची खेळी केली. इंडियाला जिंकण्यासाठी 110 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या टीमने 10.1 ओव्हरमध्ये कोणतीही विकेट न गमावता 114 धावा बनवून मॅच जिंकली.

या मॅचच्या पहिल्या डावात बांगलादेश लीजेंड्सने 19.4 ओव्हरमध्ये 109 धावा बनवल्या आणि ऑलआऊट झाले. बांगलादेशकडून नजीमुद्दीनने 33 चेंडूवर 49 धावांची खेळी केली. याशिवाय इतर कुणीही फलंदाज काही खास कामगिरी करू शकला नाही. इंडियाकडून विनय कुमार, प्रज्ञान ओझा आणि युवराज सिंहने दोन-दोन विकेट घेतल्या तर मनप्रीत गोनी आणि यूसुफ पठाणने एक-एक विकेट घेतली.