Viruses | तुमच्या फोनमध्ये असू शकतात कोट्यवधी धोकादायक किटाणू ! त्यांच्यामुळे होणार्‍या जीवघेण्या आजारापासून वाचण्याचे ‘हे’ 4 उपाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Viruses | बहुतांश लोकांच्या हातात सतत मोबाइल असतो. अनेक ठिकाणी आपण तो घेऊन जातो तसेच लहान मुले त्यास हात लावतात. आपणही सतत त्याला स्पर्श करत असतो. यामुळे स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या डिस्प्लेवर असंख्य किटाणू आणि व्हायरस (Viruses) असणे सहाजिकच आहे (smartphone or laptop to have a number of germs and viruses on its display).

 

हे किटाणू अतिशय धोकादायक ठरू शकतात.
मात्र काही नियमांचे पालन करून तुम्ही फोन स्वच्छ ठेवू शकता आणि स्वताला आजारांपासून सुरक्षित ठेवू शकता.

 

1. स्मार्टफोन असा करा डिसइन्फेक्ट (How to Disinfect smartphone)

 

बाहेरून घरात आल्यानंतर स्वता हातपाय धुण्यासह तुमचा स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस सॅनिटाइज किंवा डिसइन्फेक्ट (sanitize or disinfect your smartphone) करण्यास विसरू नका. कोविडदरम्यान जी मार्गदर्शकतत्त्व (guidelines of Covid) जारी केली होती त्यामध्ये देखील हेच म्हटले होते की, बाहेरून आल्यानंतर आपले सामान स्वच्छ करा. विशेषता स्मार्टफोन आणि गॅझेट्स.

 

2. अशी साफ करा घाण आणि फिंगरप्रिन्ट्स (Clean smartphone dirt and fingerprints)

 

  • फोन स्वच्छ ठेवण्यासाठी, त्यास सॅनिटाईज करताना डिसइन्फेक्टंटचा वापर करण्यापूर्वी फोनवर लागलेले बोटांचे ठसे आणि घाण हाताने घासून स्वच्छ करा.
  • त्यानंतरच एखाद्या डिसइन्फेक्टंट स्प्रेचा वापर करा.
  • अगोदर एका सुक्या आणि स्वच्छ फायबरने स्क्रीन आवश्य स्वच्छ करा.
  •  त्यानंतर ओल्या कपड्याने स्वच्छ करा.

 

3. डिव्हाईस असा करा पूर्ण स्वच्छ (Make the device clean completely)

 

  • डिव्हाईस स्वच्छता करताना हे लक्षात ठेवा की, सॅनिटायजर किंवा डिसन्फेक्टंट थेट डिव्हाइसच्या स्क्रीनवर स्प्रे करू नका.
    यामुळे तुमच्या फोन किंवा लॅपटॉपची स्क्रीन खराब होऊ शकते. (Viruses)
  • स्वच्छता करण्यासाठी प्रथम डिसइन्फेक्टंट एखाद्या स्वच्छ आणि नरम कपड्यावर स्प्रे करा आणि त्या कपड्याने स्क्रीन स्वच्छ करा.
  • यासोबतच हा सुद्धा प्रयत्न करा की, एक असे डिसइन्फेक्टंट वापरा ज्यात 70 टक्के अल्कोहोल असेल.
  • स्वच्छता करतान डिव्हाईस स्विचऑफ करा.
  • फोन चार्जिंगला लावलेला असताना स्वच्छता करू नका अन्यथा डिव्हाइसमध्ये मॉयस्चर जाऊ शकते. यामुळे फोन खराब होऊ शकतो.

 

4. फोनचे कव्हर सुद्धा करा स्वच्छ (Also clean the phone cover)

 

जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन वेळोवेळी स्वच्छ करत असाल तर त्याचे कव्हर सुद्धा नेहमी स्वच्छ करा.
कारण कव्हरचे किटाणू सुद्धा वारंवार फोनच्या पृष्ठभागावर लागू शकतात आणि सोबतच आपण फोनच्या कव्हरला सुद्धा सतत स्पर्श करत असतो.
यासाठी ते साबण आणि पाण्याने स्वच्छ करणे सुद्धा खुप आवश्यक आहे.

 

Web Title : Virus | millions of dangerous bacteria and virus may have in your phone there is a danger of deadly diseases like corona

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Earn Money | नोकरीसह 1 लाख रुपयात सुरू करा हा बिझनेस, महिन्याला होईल 40000 पेक्षा जास्त कमाई, सरकार करेल 80% मदत

7th Pay Commission | ‘या’ सेक्टरच्या कर्मचार्‍यांना सुद्धा येणार वाढीव पगार, नोव्हेंबरपासून महागाई भत्त्यात झालीय वाढ

Ajit Pawar | अजित पवारांना ‘कोरोना’ सदृश्य लक्षणं, ड्रायव्हरसह 4 कर्मचाऱ्यांना Coronaची लागण