Ajit Pawar | अजित पवारांना ‘कोरोना’ सदृश्य लक्षणं, ड्रायव्हरसह 4 कर्मचाऱ्यांना Coronaची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  दरवर्षी बारामतीत दिवाळीचा वेगळा उत्साह पहायला मिळतो. पवार कुटुंबियांना (Pawar family) दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शुभेच्छा स्विकारल्या. मात्र, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अनुपस्थित होते. अजित पवार (Ajit Pawar) यावेळी नसल्याने लगेच याची वेगवेगळी चर्चा सुरु झाली.

 

या कार्यक्रमाला अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित नसल्याने ते का आले नाहीत, याची लगेच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली.
मात्र, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अनुपस्थितीचं कारण दिलं आहे.
अजित पवारांच्या (Ajit Pawar) स्टाफ मधील ड्रायव्हरसह 4 लोक कोरोना (Corona) बाधित आढळले आहेत.
त्यामुळे अजित पवार आजच्या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले.

 

तसेच अजित पवारांना देखील कोरोना सदृश्य लक्षण असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
त्यांची टेस्ट (Corona Test) झाली असून रिपोर्ट येणे बाकी असल्याचे ते म्हणाले.
त्यामुळे रिस्क नको म्हणून येऊ नका असं अजित दादांना सुचवलं असं शरद पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या घरातील 3 कर्मचारी कोरोना बाधित तर 2 ड्रायव्हर कोरोना बाधित झाले आहेत.
त्यामुळे अजित पवार उपस्थित राहू शकले नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी नंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

 

Web Title : Ajit Pawar | symptoms of corona in maharashtra deputy cm ajit pawar, ajit pawar’s driver and other staff of 4 tested corona positive

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO | बँक अकाऊंटमध्ये आले नसेल PF चे व्याज तर इथं करा तक्रार, मिस्ड कॉलशिवाय SMS द्वारे 1 मिनिटात जाणून घ्या बॅलन्स

Chandrakant Patil | एक मास्क विकत घेतला नाही, चेक हातात घेऊन फिरले, सगळा पैसा केंद्रानं दिला; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Post office franchise | फक्त 5 हजारात घेऊ शकता पोस्ट ऑफिसची फ्रेंचायजी, पहिल्या दिवसापासून मोठी कमाई; जाणून घ्या काय आहे प्रोसेस?