‘व्हिसा’ आणि ‘मास्टरकार्ड’नं म्हटलं – ‘पॉर्नहब’ बरोबरच्या व्यवसाय संबंधांची चौकशी केली जाईल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिग्गज क्रेडिट कार्ड कंपन्या व्हिसा आणि मास्टरकार्डने म्हटले आहे की, ते पॉर्नहब (Pornhub) शी असलेल्या त्यांच्या व्यवसाय संबंधांची चौकशी करतील. एका वृत्तपत्राच्या अग्रगण्य स्तंभकाराने असा आरोप केला आहे की, अश्लील व्हिडिओ प्रसारित करणारी ही वेबसाइट दुष्कृत्यासह अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवते, त्यानंतर कंपन्यांचे हे विधान पुढे आले आहे.

‘द न्यूयॉर्क टाइम्स’चे स्तंभलेखक निकोलस क्रिस्टाॅफ यांनी शुक्रवारी लिहिले होते की, पॉर्नहब वेबसाइटमध्ये दुष्कृत्याचे व्हिडिओ, सूडबुद्धीने बनविण्यात आलेले अश्लील व्हिडिओ आणि लोकांच्या परवानगीशिवाय तयार केलेले व्हिडिओ दर्शविले जात आहेत. पॉर्नहबने अद्याप या आरोपांवर कोणतेही भाष्य केलेले नाही.

पेपलने थांबविली आपली सेवा

ऑनलाइन पेमेंट सेवा प्रदाता कंपनी ‘पेपल’ (Paypal) ने मागील वर्षी पॉर्नहबसाठी सेवा थांबविली होती. पॉर्नहब ‘माइंडगीक’ यांच्या मालकीची आहे. या वेबसाइटवर कार्यरत असलेल्या इतर क्रेडिट कार्ड कंपन्यांनी पॉर्नहब बरोबर काम करणे थांबवावे, असे आवाहन स्तंभलेखकाने केले आहे. क्रिस्तोफच्या स्तंभावर प्रतिक्रिया व्यक्त करताना व्हिसा आणि मास्टरकार्ड यांनी रविवारी सांगितले की ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

वित्तीय संस्थांपासून ते मालकीच्या कंपनीसोबतही चर्चा

व्हिसाने म्हटले की, “आम्हाला या आरोपांची माहिती आहे आणि त्वरित चौकशीसाठी आम्ही संबंधित वित्तीय संस्थांशी चर्चा करीत आहोत. या व्यतिरिक्त आम्ही या वेबसाइटच्या मालकीच्या कंपनीशी थेट चर्चा करत आहोत.” ते म्हणाले की वेबसाइटवरचे आरोप खरे असल्याचे सिद्ध झाल्यास व्हिसाद्वारे पैसे देण्यासाठी बंदी घातली जाईल. मास्टरकार्डनेदेखील सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरू आहे.