Vishakha Subhedar | विशाखा सुभेदार लवकरच करणार स्टार प्रवाहवरील ‘या’ मालिकेत पुनरागमन

पोलीसनामा ऑनलाइन : ‘फू बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) हिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशाखाने (Vishakha Subhedar) अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तर पुन्हा एकदा ती छोट्या पडद्यावर आगमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर आता ‘शुभविवाह’ ही मालिका 16 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये विशाखा सुभेदार ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. याची माहिती तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना दिली आहे.

विशाखाने मालिकेचा प्रोमो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की, “लवकर छोट्या
पडद्यावर ‘शुभविवाह’ घेऊन येत आहोत”. या मालिकेत विशाखा दोन मुलांची आई दाखवली आहे.
मात्र तिची भूमिका सकारात्मक असेल की नकारात्मक हे स्पष्ट झाले नाही.
या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र हे
कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. आपल्या बहिणीच्या सुखासाठी आपल आयुष्य पणाला
लावणाऱ्या बहिणीच्या त्यागाची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली आहे.

Web Title :- Vishakha Subhedar | actress vishakha subhedar comeback in marathi serial shubh vivah promo viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Bogus NA Order | पुण्यात बोगस NA ऑर्डर लावून दस्त नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करा, रोहन सुरवसे पाटील यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन

Tejaswini Pandit | अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दुनियादारी चित्रपटाबद्दल केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट