Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; लायन्स् इलेव्हन, लिंक्स् इलेव्हन संघांची विजयी कामगिरी!

पुणे : व्हिजन स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील (Vision Cup Under-15 Cricket Tournament) टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेत लायन्स् इलेव्हन संघाने तिसरा तर, लिंक्स् इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून दुसरा विजय नोंदविला. (Vision Cup Under-15 Cricket Tournament)

सनसिटी रोड येथील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी मैदानावर झालेल्या सामन्यात देवल देशपांडे याच्या भेदक मार्‍याच्या कामगिरीमुळे लायन्स् इलेव्हन संघाने लिंक्स् इलेव्हन संघाचा २८ धावांनी पराभव करून स्पर्धेत तिसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना लायन्स् इलेव्हन संघाने १३२ धावांचे आव्हान उभे केले. आशिषकुमार शर्मा (२० धावा), तनिष्का नवले (१८ धावा) आणि सायन पात्रा (१७ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाला समाधानकारक धावसंख्या उभी करून दिली. लिंक्स् इलेव्हन संघाच्या दुर्गेश सहानी (३२ धावा) आणि आदित्य वाल्मिकी (नाबाद २० धावा) यांनी छोट्या खेळी करून चांगला प्रतिकार केला. देवल देशपांडे याने १३ धावात ४ गडी बाद करून लायन्स् संघासाठी विजय दृष्टीक्षेपात आणला. लिंक्स् संघाचा डाव १०४ धावांवर मर्यादित राहीला.

राधेश आढाव याच्या नाबाद ५८ धावांच्या खेळीमुळे लिंक्स् इलेव्हन संघाने जॅग्वॉर्स इलेव्हन संघाचा ६ गडी राखून
सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना जॅग्वॉर्स इलेव्हन संघाने १२३ धावा धावफलकावर लावल्या.
आशय शेडगे (२४ धावा), शर्विल गोसावी (२० धावा), वीर बोहाट (१४ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. राधेश आढाव याने ५४ चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ५८ धावांची खेळी करून लिंक्स् इलेव्हन संघाला एकहाती विजय मिळवून दिला. (Vision Cup Under-15 Cricket Tournament)

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
लायन्स् इलेव्हनः २० षटकात ८ गडी बाद १३२ धावा (आशिषकुमार शर्मा २०, तनिष्का नवले १८, सायन पात्रा १७,
तोशित चोपडे ३-१४, मल्हार कमलाकर २-२३) वि.वि. लिंक्स् इलेव्हनः २० षटकात ८ गडी बाद १०४ धावा
(दुर्गेश सहानी ३२, आदित्य वाल्मिकी नाबाद २०, धवल देशपांडे ४-१३); सामनावीरः देवल देशपांडे;

जॅग्वॉर्स इलेव्हनः २० षटकात ८ गडी बाद १२३ धावा (आशय शेडगे २४, शर्विल गोसावी २०, वीर बोहाट १४,
राधेश आढाव ३-१६, वरद शिरसाट २-२५) पराभूत वि. लिंक्स् इलेव्हनः १९ षटकात ४ गडी बाद १२७ धावा
(राधेश आढाव नाबाद ५८ (५४, ८ चौकार), विनीत इरकल १५, सुयस दहीभाते २-२४); सामनावीरः राधेश आढाव;

Web Title :- Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘Vision Trophy’ Championship Under-15 Cricket Tournament; Winning performance of Lions XI, Lynx XI teams!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rajnath Singh Pune Visit | संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली बापट कुटुंबियांची सांत्वनपर भेट; बापट यांच्या स्मृतीचे केले स्मरण (VIDEO)

Gulabrao Patil | मी एकट्यानं उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं?, गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण

Pune PMC News | पालिका आयुक्तांची पूरग्रस्त वसाहतीत धडक कारवाई; नागरिक संतप्त