अभिनेत्री कृती खरबंदानं घातला Neon ड्रेस, ‘या’ सीजनमध्ये ‘ट्रेंड’ करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कृती खरबंदा आपल्या स्टाईल आणि फॅशनमुळे सध्या चर्चेत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नियॉन कलर खूप कूल मानला जातो. अनेक बॉलिवूड स्टार सिक्वेन ड्रेस कॅरी करतात. कृतीनं नियॉन येलो कलरचा वनपीस सीक्वेन ड्रेस कॅरी केला आहे ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. सोबत तिनं कोणतीही एक्सेसरी कॅरी केलेली नाही. जर तुम्हाला कृतीप्रमाणेच उन्हाळ्यात कूल आणि हॉट दिसायचं असेल तर तुम्ही कृतीचा हा लुक कॅरी करू शकता.

फ्लोरल ड्रेस –
कृतीनं काही दिवसांपर्वी ब्लॅक कलरमधील फ्लोरल ड्रेसचा एक फोटो शेअर केला होता. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. या ड्रेसवर कॉन्ट्रास्ट कलरचे फ्लॉवर होते. हा एक मॅक्सी ड्रेस होता. तिनं पर्ल चोकर नेकलेसही घातला होता जो खूप ट्रॅडिशनल वाटत होता. यामुळे कृती रॉयल दिसत होती.

मरमेड गाऊन –
कृती खरबंदा मरमेड गाऊनमध्येही खूप सुंदर दिसली होती. ब्लॅक कलरच्या या मरमेड गाऊनवर ब्लू कलरच्या स्टोन्सचं काम होतं. यामुळे तिची फिगर खूप स्लीक आणि सोबत दिसत होती. हा एक डीप नेक हाल्टर नेक गाऊन आहे.