Wanwadi Pune Crime | न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळ यांच्यासह 12 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Wanwadi Pune Crime | न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) करुन घर बळकावल्या प्रकरणी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर (Balasaheb Shivarkar), पोलीस निरीक्षक धनंयज पिंगळ (PI Dhananyaj Pingl) यांच्यासह 12 जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे.

माजी आमदार आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळ, अरुण भुजबळ
(रा. फातिमानगर, वानवडी), विद्या अरुण भुजबळ व मुलगा, प्रशांत पवार, उमेश भुजबळ, सदानंद तेलगु व त्यांची मुलगी आणि जावई, कांताबाई बंडोबंत लांडगे, राजेंद्र बापुराव सुर्वे, तुकाराम किसण अगरकर, सपना घोरपडे, मनिषा गायकवाड व इतर यांच्यावर आयपीसी 143, 452, 427, 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नानापेठ येथे राहणाऱ्या 67 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Wanwadi Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वानवडी येथील सर्वे नं. 84/1 येथे घर आहे. या घराचा वाद न्याय प्रविष्ठ आहे.
10 एप्रिल रोजी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळ यांच्यासह इतर आरोपींनी संगनमत
करुन घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. आरोपींनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान केला.
या प्रकरणी महिलेने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार वानवडी पोलिसांनी माजी आमदार व माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळ
यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Election 2024 | महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 25 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार; पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी जाहीर सभा

Pune Crime Branch | पुणे पोलिसांचे सराईत गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर; सराईत गुन्हेगार नवनाथ वाडकर आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांमध्ये गोळीबाराचा थरार !

Aaditya Thackeray On BJP | आदित्य ठाकरेंचा सवाल, म्हणाले – ”शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, गोळ्या चालवल्या, त्या भाजपाला मत देणार का?”