Video : शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ला विसरा, आता ‘कविता सिंह’चा ‘हा’ व्हिडीओ घालतोय इंटरनेटवर ‘धुमाकूळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता शाहिद कपूरचा कबीर सिंह सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. केवळ १३-१४ दिवसात कबीर सिंह सिनेमाने २०० कोटीचा टप्पा पार करत अनेक रेकॉर्ड मोडले. अधिकाधिक या सिनेमाने तरूण वर्गाला भूरळ घातली आहे. त्यामुळे कबीर सिंह सिनेमातील अनेक गाणी सोशल मीडियावर एडिट करून व्हायरल होऊ लागली आहेत. मात्र सोशल मीडियावर सध्या कबीर सिंह सोबत अजून एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. आणि हा व्हीडिओ लोकांच्या पसंतीसही पडत आहे.

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडिओ ‘कबीर सिंह’चा नसून ‘कविता सिंह’ चा आहे. सर्वांना प्रश्न पडला असे हे काय प्रकरण आहे. यात तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा व्हीडिओ म्हणजे कबीर सिंहचे फिमेल व्हर्जन आहे. कबीर सिंहच्या जागेवर एखादी मुलगी असते तर ती कशी असेल, यावर हा व्हीडिओ बनवण्यात आला आहे. Old Delhi Films नावाच्या एका यूट्यूब चॅनेलने हा व्हीडिओ तयार केला आहे. हा व्हीडिओ इतका व्हायरल झाला आहे की फक्त दोन दिवसात ४ दशलक्षपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेक लोकांनी तो शेअर करत त्यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

व्हीडिओमध्ये कविता सिंहची भूमिका करणाऱ्या मुलीचे नाव युक्ती अरोरा आहे. तिने फक्त ४.४८ मिनीटांच्या व्हीडिओमध्ये कमालीचा अभिनय केला आहे. तिच्या सह या व्हीडिओमध्ये ईशा सिंह चौहान, अभिजीत चतुर्वेदी, शशांक शर्मा, श्वेता गुप्ता आणि अनिकेत जैसवाल यांनीही अभिनय केला आहे. ‘कबीर सिंह’ सारखा ‘कविता सिंह’चा व्हीडिओही लोकांना आवडत आहे.

व्हीडिओ लिंक –

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

Loading...
You might also like