जीपीएस सिस्टीमद्वारे मिरवणूकीवर वॉच : पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गणेश विसर्जन मिरवणूकीत डीजे लावण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, त्यानंतरही काही मंडळ डीजे लावण्यासाठी आग्रही आहेत. परंतु, डीजे लावल्यास तो न्यायालयाचा अवमान होईल. तरीही, डीजे लावल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली. तसेच, आतापर्यंत शहरात ज्या मंडळांनी डीजे लावला आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचेही सांगितले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eb591984-be86-11e8-b0a0-1b3985f9c3c4′]

पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सावाची सांगता आज (रविवार) होत असून, सकाळी १० वाजता विसर्जन मिरवणूकीला सुरूवात होणार आहे. पोलिस गणेशोत्सवाची सांगता व गणेशभक्तांची सेवा करण्यास सज्ज आहेत. गणेश विसर्जन मिरवणूकीवर सीसीटीव्ही व जीपीएस सिस्टीम यामाध्यमातूनही देखरेख केली जाणार आहे.

दरम्यान, शहरातील काही मंडळांकडून डीजे लावण्याचा आग्रह धरला जात आहे. डीजे पाहिजे हे म्हणणे चुकीचे आहे. नागरिकांनाही मिरवणूकीत डीजे नसवा, असे वाटत आहे. यापुर्वी शहरात डीजे लावणार्‍या मंडळांवर कारवाई केली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सर्वांनी शांततेत मिरवणूक पार पाडावी. डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलिस कायद्याच्या कक्षेत राहून काम करतील. कार्यकर्त्यांनीही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे आणि विसर्जन मिरवणूक उत्साहात साजरी करावी, असेही यावेळी आयुक्त व्यंकटेशम यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B00S2SEV7K’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4368574-be89-11e8-86d8-cb5c37126014′]

गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी साडेसात हजार पोलीसाचा बंदोबस्त

पुण्यातील मानाच्या गणपतींसह इतर अनेक मोठ्या मंडळांच्या गणपतीचे विसर्जन मिरवणूने करण्यात येते. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणे तसेच राज्यातील इतर भागातील नागरिक पुण्यात येत असतात. विसर्जन मिरवणूकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासासठी पुणे पोलिसांचा साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. तसेच सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f4d5b011-be86-11e8-a4c8-73f33fd3e079′]

पुणे शहरामध्ये सातव्या, नवव्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. तर उर्वरीत गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन शेवटच्या दिवशी होत असते. शेवटच्या दिवशी अडीच हजार मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होत असते. रविवारी (दि.२३) सकाळी दहावाजता विसर्जन मिरवणूकीला सुरुवात होणार असून मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावरुन साडेसहाशे गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होत असते. त्यामुळे विसर्जनादिवशी वाहतूक विभागाकडून शहरातील १७ मुख्य रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

विसर्जन मिरवणूक शांततेत व उस्ताहात पार पडावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. शहरामध्ये साडेसात हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये ४५ अधिकारी, दीडशे कर्मचाऱ्यांचा बाहेरून बंदोबस्त देण्यात आला आहे.

लक्ष्मी, कुमठेकर, टिळक, केळकर, शिवाजी रोड परिसरात मुख्य विसर्जन मिरवणूक चालते. या ठिकाणी साधारण २९०० पोलिस कर्मचारी व अधिकारी आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या तैनात राहणार आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी सहा ठिकाणी मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच, १३ ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या नऊ टीम बंदबस्तामध्ये तैनात राहणार आहे.
[amazon_link asins=’B00TFGWAA8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’071e2ad3-be87-11e8-8bea-c3b3ed80ed10′]

मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावरील लक्ष्मी रोड- ५२ कॅमरे, कुमठेकर रोड- २१ कॅमेरे, केळकर रोड – ३३ कॅमरे, टिळक रोड- ३१ कॅमेरे, शिवाजी रोड ३२ कॅमरे राहणार आहेत. तसेच, विसर्जन मिरवणुकीत चोऱ्या व छेडछाडीचे गुन्हे राेखण्यासाठी गुन्हे शाखेची पथके तैनात राहणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही आफवांवर विश्वास ठेऊ नये. संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन विशेष शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे यांनी केले आहे.

पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्त चार, १३ पोलिस उपायुक्त, २८ सहायक आयुक्त, १४६ पोलिस निरीक्षक, ४४८ पोलिस उपनिरीक्षक आणि सहायक निरीक्षक, ७ हजार २९ कर्मचारी, ३५० होमगार्ड यांचा समावेश असणार आहे.

पुणे | गणपती विसर्जना दिवशी पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त