धक्कादायक ! ‘या’ प्रसिद्ध WWE रेसलरचा लढाई दरम्यान रिंगमध्ये मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डब्लूडब्लूई मधील प्रसिद्ध रेसलरचे रिंगमध्येच धक्कादायक निधन झालं आहे. सिल्वर किंग असं रेसलरचे नाव आहे. सामना सुरु असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे जेव्हा हा सर्व प्रकार घडला, तेव्हा हा खेळाचाच एक भाग असल्याचं समजून कुणीही सिल्वर किंगकडे लक्ष दिलं नाही. सिल्वर किंगच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

मेक्सिको येथील ५१ वर्षीय सेजार बॅरन हा WCW चा कुस्तीपटू होता. WWE मध्ये त्याला सिल्वर किंग या नावाने ओळखले जाई. लंडनमध्ये गेल्या शनिवारी रात्रीच्या सुमारास ‘द ग्रेटेस्ट शो ऑफ लूचा लिब्रे’ या कार्यक्रमात सामना सुरु होता. या सामन्यात तो अचानक कोसळला. सिल्वर किंग हा गुरेरा या रेसलरविरुद्ध लढत होता. यावेळी प्रेक्षकांना देखील हा खेळाचाच भाग असल्याचे वाटले. मात्र बराच वेळ झाला तरी तो उठला नाही. यानंतर मात्र डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर शोच्या आयोजकांनी परिसर रिकामा केला.

या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांनी मोठ्या प्रमाणावर आपला संताप व्यक्त केला. आयोजकांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सिल्वर किंग बराच वेळ पडून होता, मात्र आयोजकांनी यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप लोकांनी केला आहे. कुणाचेही त्याच्याकडे लक्ष नव्हते, तो बराच वेळ पडून होता, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दरम्यान, या प्रकरणी कॅमडेन काऊन्सिल या प्रकरणाचा तपास करणार असल्याची माहिती काऊन्सिलच्या प्रवक्त्यांनी दिली.

Loading...
You might also like