CBSE 2021 : सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 4 मे पासून या परीक्षा घेण्यात येणार आहेत असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केलं आहे. या परीक्षा 10 जून पर्यंत चालतील. 15 जुलैपर्यंत या परीक्षांचा निकाल लागणार आहे असंही ते म्हणाले आहेत.

आता परीक्षांच्या ताराखा जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मात्र सुटकेचा निश्वास टाकला आहे. एएनआयनं ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.