Weak Sperm | प्रेग्नंसी रोखणारी गर्भनिरोधक अँटीबॉडी, 15 सेकंदात स्पर्मला करेल कमजोर – स्टडी

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – Weak Sperm | अमेरिकन शास्त्रज्ञांनी विशेष प्रकारच्या गर्भनिरोधक अँटीबॉडी (Birth Control Antibody) विकसित केली आहे. ती स्पर्म  Weak Sperm) ला कमजोर करेल, जेणेकरून जन्मदर (Birth Rate) नियंत्रित करता येऊ शकतो. बोस्टन युनिव्हर्सिटी (Boston University) आणि सॅनडिएगो (San Diego) ची कंपनी जॅबबायो (Jabbio) ने मिळून ती तयार केली आहे. शास्त्रज्ञांनी यास ह्यूमन कन्ट्रासेप्शन अँटीबॉडी (Human contraceptive antibody) नाव दिले आहे.

नवीन गर्भनिरोधक अँटीबॉडी (Birth Control Antibody) ची मनुष्याच्या वेगवेगळ्या क्वालिटीच्या स्पर्मवर ट्रायलसुद्धा करण्यात आली. ट्रायलमध्ये समोर आले आहे की, ती 15 सेकंदमध्ये स्पर्म (Sperm) ला कमजोर करून निष्क्रिय करते.

संशोधकांनी म्हटले की, जर कंडोम सोडला तर बहुतांश गर्भनिरोधक उपाय महिलांसाठी तयार करण्यात आले आहेत. सध्या नेस्टॉरवनची ट्रायल केली जात आहे. हे पहिला हार्मोन कन्ट्रॉसेप्टिव्ह आहे, ज्याचा वापर पुरुष करू शकतील. हे औषधाऐवजी एका जेलच्या प्रकारात तयार केले गेले आहे.

सूजचा धोका नाही
बोस्टन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर देबोरह अँडरसन म्हणाले की, या गर्भनिरोधक अँटीबॉडीला महिलेच्या मागणीवर तिच्या वेजाइनामध्ये टाकले जाऊ शकते. ही अँटीबॉडी महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कोणत्या प्रकारची सूज निर्माण करत नाही. मुनष्यावर पहिल्या फेजची ट्रायल केली जात आहे.

सेक्श्युअली ट्रान्समिटेड आजार रोखू शकते
संशोधकांनी म्हटले की, अनेक असे आजार आहेत जे सेक्सद्वारे दुसर्‍या निरोगी मनुष्यांमध्ये पसरतात.
जसे की -एचआयव्ही व्हायरस आणि हार्पीस सिम्पेक्स व्हायरस.
अशा आजारांमध्ये गर्भनिरोधक अँटीबॉडीज दुसर्‍या अँटीबॉडीजसह मिसळून वापरता येऊ शकते.

Web Title :- Weak Sperm | international studies scientists develop contraceptive antibodies that weak sperm

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | गहाळ झालेले मंगळसूत्र सहकारनगर पोलिसांच्या प्रयत्नाने परत

तात्काळ अपडेट करा तुमचा Smartphone, आता हसून उघडू शकता फोनचा कॅमेरा; तोंड उघडल्यावर दिसतील मेसेज

Pune Crime | सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांकडून अटक; पिस्टल, काडतुसे जप्त