इंदिरा गाधींवरील वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट दिग्दर्शक रितेश बत्रा हे त्यांच्या ‘द लंच बॉक्स’ आणि ‘फोटोग्राफ’ या चित्रपटानंतर चांगलेच चर्चेत आहेत. बत्रा आता भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित वेब सिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत. हल्ली वेब सिरीजचा जमाना आहे. त्यामुळे हि वेब सिरीज सुद्धा प्रतीक्षेत आहे. सुप्रसिद्ध अभिनेती विद्या बालन इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार झळकणार आहेत.

तसेच ही वेब सिरीज, लेखिका सागरिका घोष यांच्या ‘इंदिरा : इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित असणार आहे. या वेब सिरीजच्या निर्मितीसाठी या पुस्तकाचे हक्क विद्या बालनने विकत घेतले आहेत. तसं विद्याची ही पहिलीच वेब सिरीज असणार आहे.

याबाबत बोलताना विद्या म्हणाली, ही माझी पहिलीच वेब सिरीज असणार आहे. रॉनी स्क्रूवाला या वेब सिरीजची निर्मिती करत आहेत. सध्या आम्ही सगळेच या पुस्तकाचा आणि विषयाचा अभ्यास करत आहोत. इंदिराजींच्या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या प्रसंगांची माहिती मिळवत आहोत. हे काम प्रचंड मेहनतीचे आहे. त्यामुळे याला वेळ लागतोय.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like