Aarya Review : मास्टरपीस बनण्याच्या लाईनच्या एकदम जवळ सुष्मिता सेनची सीरिज ‘आर्या’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  डिज्नी प्लस हॉटस्टारवर आर्या ही वेब सीरिज झाली आहे. खास बात अशी की, या सीरिजमधून अभिनेत्री सुष्मिता सेन हिनं 17 वर्षांनंतर अॅक्टींगमध्या वापसी केली आहे. इतकंच नाही तर हा तिचा डिजिटल डेब्यू आहे. सुष्मितानं जोरदार वापसी केली आहे. सीरिज नेमकी कशी आहे हे आपण जाणून घेऊयात.

स्टोरी

आर्या ही सीरिज पोनजा या डच वेब सीरिजचा ऑफिशियल रिमेक आहे. पोनजाचा सरळ साधा अर्थ काढला तर पोनजा म्हणजे लेडी डॉन. सीरिजची स्टोरी एका लेडी डॉनच्या आसपास फिरताना दिसते. आर्या सरीनचं कुटुंब बेकायदेशीर अफू आणि औषधांच्या बिजनेसमध्ये व्यस्त आहे. आर्याचा पती तेज सरीन, भाऊ संग्राम आणि दोस्त जवाहर असे तीन पार्टनर आहेत. संग्राम आणि जवाहर यांना पुढे जाऊन हिरोईनच्या बिजनेसमध्ये उतरायचे आहे. परंतु तेज यासाठी तयार नाही. कारण यात आधीच शेखावत नावाचा मोठा क्रिमिनल आहे. तर आर्याची अशी इच्छा आहे की याचा परिणाम मुलांवर होऊ नये. यासाठी ती तेजवर दबाव टाकते की, त्यानं या धंद्यातून बाहेर पडावं. तेज यासाठी तयार असतानाच त्याचा भाऊ संग्राम पकडला जातो. तेजलाही गोळी मारून ठार केलं जातं. आर्यालाही अनेक लोकांकडून धमक्या येऊ लागतात. लोक तिला पैसे मागू लागतात. आर्याला तिच्या पतीचा खुनी कोण आहे हेही शोधायचं असतं. नार्कोटीक्स डिपार्टमेंटही तिच्या मागे आहे. मुलांना वाचवण्यासाठी आर्या अखेर या दलदलीत उतरते. ती मुलांना वाचवते का. पतीचा खुनी शोधते का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही सीरिज पहावी लागेल.

काय आहे खास ?

1)  या सीरिजची खास बात आहे ती म्हणजे सुष्मिता सेनची अॅक्टींग. तिला पुन्हा स्क्रीनवर पाहणं शानदार वाटत आहे. तिची अॅक्टींग खासच आहे. चंद्रचूड सिंह यानं तिच्या पतीची भूमिका साकारली आहे. सुष्मिताच फिटनेस पाहण्यासारखा आहे. सुष्मितासमोर तो काहीसा डल वाटतो. सिकंदर खेरनंही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. परंतु त्याला जास्त डायलॉग्स दिसत नाहीत. आर्याची ऑनस्क्रीन मुलं वृती, वीरेन, प्रत्यक्ष पवार यांनीही प्रभावशाली काम केलं आहे.

2)  वेब सीरिज स्टोरी तुम्हाला खूप रोचक वाटेल. खास बात अशी आहे की, ही स्टोरी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ही सीरिजद 9 एपिसोडची आहे. एका परदेशी सीरिजला भारतीय प्रांतात उतरवण्यात लेखकाला यश आलं हे यात शंका नाही. कुठेही ओझं वाटत नाही.

3) डायरेक्शनदेखील तुम्हाला इम्प्रेस करताना दिसेल. परदेशी सीरिज भारतीय प्रांतात उतरवणं एवढं सोपं काम नव्हतं. डायरेक्टर राम माधवानी, संदीप मोदी आणि विनोद रावत यांना यात यश आलं आहे. तसं पाहिलं तर स्टोरी एवढी छानपैकी वापरू शकले नाही. परंतु कलाकारांचा छान वापर केला आहे. तांत्रिकदृष्ट्या कॅमेऱ्याचं काम तुम्हाला योग्य वाटेल.

कुठे राहिली कमतरता ?

1)  सीरिजमध्ये आणखी काम करण्याची आशा आहे. स्टोरीवर संदीप श्रीवास्तव आणि अनु चौधरी आणकी मेहनत करू शकत होते. स्पीड घ्यायलाही सीरिजला वेळ लागत आहे. याचा अर्थ असा की, सुरुवातीचे काही एपिसोड स्लो आहेत. विशेष म्हणजे लक्षात ठेवला जावा असा एकही डायलॉग नाहीये यात.

2)  म्युझिक जास्त खास झालं नाही असं वाटत आहे. मध्येच काही कविता म्हणण्याचा प्रयत्न झाला आहे. या कविता तुम्हाला कनेक्टही करत नाहीत. बॅकग्राऊंड स्कोरही साधारण आहे.

शेवटी

सुष्मिता सेनची वापसी साऱ्यांनाच आवडणार आहे. सीरिजमध्ये ज्या कमतरता आहेत त्या या सीरिजला मास्टरपीस बनण्याच्या लाईनच्या बरोबर अलीकडेच थांबवतात. परंतु ही सीरिज तुमचा वेळ वायाल घालवत नाही एवढं मात्र आहे.