‘गुलाबो सिताबो’च्या ऑनलाईन रिलीजच्या वादावार ‘बिग बीं’नी दिली प्रतिक्रिया ! म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता मेकर्सनी गुलाबो सिताबो हा सिनेमा 12 जून रोजी अ‍ॅमेझॉन प्राईमवर ऑनलाईन रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना स्टारर या सिनेमाच्या ट्रेलरची घोषणा अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना आणि शुजित सरकार यांनी मिळून केली होती. यानंतर आता सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलरची खूप चर्चा होताना दिसली. परंतु हा सिनेमा ऑनलाईन रिलीजचा निर्णय झाल्यानंतर आता मल्टीप्लेक्स असोसिएशन खूप तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

फक्त गुलाबो सिताबोच नाही तर विद्या बालन स्टरर शकुंतला देवी आणि अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हे सिनेमे ओटीटी रिलीज होण्याची शक्यता आहे. यावरून सुरू असलेल्या वादावर आता अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, सरवाईव करण्यासाठी परिवर्तनाला जवळ करणं गरजेचं आहे.

एका मुलाखतीत थिएटर रिलीज आणि ओटीटी रिलीजवर बोलताना बिग बी म्हणाले, “मला यात खास असा काही फरक नाही वाटत. मी गेल्या 51 वर्षांपासून काम करत आहे. मी अनेक बदलांचा साक्षीदार आहे. सरवाईव करण्याचा सर्वात योग्य मार्ग आहे तो म्हणजे परिवर्तनाला जवळ करा. त्याच्या वाद घालू नका.”

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.