MX Player च्या ‘बुलेट्स’ सहित या विकेंडला ‘ही’ वेब सिरीज आणि चित्रपट करतील मनोरंजन, पहा संपूर्ण यादी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  एमएक्स प्लेयर (MX Player) वर प्रकाश झाच्या ‘आश्रम’ नंतर आणखी एक धमाकेदार वेब सिरीज स्ट्रीम (MX Player web series) करण्यात आली आहे, जिचे नाव आहे बुलेट्स. या अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर वेब सीरिजमध्ये सनी लिओनी आणि करिश्मा तन्ना मुख्य भूमिकेत आहेत. या दोघीही जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहेत.

बुलेट्सचे दिग्दर्शन देवांग ढोलकिया यांनी केले आहे. या सिरीजमध्ये सनी आणि करिश्मा टीना आणि लोलो या भूमिकेत आहेत, ज्या दोन देशांमधील बेकायदा शस्त्रास्त्र करार रोखण्याच्या मिशनवर निघालेल्या आहेत. यासाठी त्यांना एक शक्तिशाली खलनायकाचा सामना करावा लागतो, जो एक नेता आहे. बुलेट्स पहिल्यांदा 30 ऑक्टोबरला स्ट्रीम करण्यात येणार होती पण अचानक तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. टीना आणि लोलोच्या शीर्षकापूर्वी चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या सिरीजमध्ये दीपक तिजोरी, विवेक वासवानी, अमान एफ. खान, ताहा शाह आणि मोहन कपूरसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

अ‍ॅमेझॉन प्राइमवर अमेरिकन गॉड्स सिरीजचे तिसरे सीझन 10 जानेवारीला येत आहे. हे एका काल्पनिक कादंबरीचे रूपांतर आहे. यामध्ये रिकी व्हाइट, एमिली ब्राउनिंग आणि पाब्लो श्रायबर मुख्य भूमिकेत आहेत. तसेच आर माधवन आणि श्रद्धा श्रीनाथची मारा देखील 8 जानेवारीला प्राइमवर रिलीज झाली आहे. हा एक तमिळ चित्रपट आहे.

याशिवाय 7 जानेवारी रोजी झी 5 वर कागज हा चित्रपट रिलीज झाला आहे. पंकज त्रिपाठी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले आहे, तर सलमान खान निर्माता आहेत. कागज ही एक भरतलाल नावाच्या मृतकाची कथा आहे, ज्यास सरकारी कागदपत्रांत मृत घोषित करण्यात आले होते. स्वत:ला जीवंत म्हणून सिद्ध करण्यासाठी त्याने 18 वर्षे कायदेशीर लढा दिला आहे.

1 जानेवारी रोजी झी 5 वर आलेली ‘नेल पॉलिश’ आपण पाहिली नसल्यास, आपण ती आता पाहू शकता. हा सायकोलॉजिकल थ्रिलरसहित जबरदस्त कोर्ट रूम ड्रामा आहे. बग्स भार्गव कृष्णा दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुन रामपाल, मानव कौल, आनंद तिवारी आणि रजित कपूर मुख्य भूमिकेत आहेत.