‘मिर्जापूर’ ! आत सुरू होता गोळीबार तर बाहेर कारमध्ये बसून राहिले ‘वर-वधू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबच्या तरनतारनमध्ये वर- वधू लग्नाचे रीतिरिवाज पूर्ण करून उर्वरित कार्यक्रमासाठी हायवेवर असलेल्या मॅरेज पॅलेसच्या बाहेर पोहचले तेव्हा त्यांना पोलीस आत जाण्यास मनाई करत होते. पोलिसांनी मॅरेज पॅलेसच्या चारी बाजूंना पोलिसांनी घेरले होते. कारण आत पाच लुटारू लपलेले होते आणि ते सतत गोळीबार सुरु होता. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पोलीस देखील गोळीबार करत होते. जेव्हा पोलीस लुटारूंचा पाठलाग करत होते, तेव्हा लुटारूंनी मॅरेज हॉलमध्ये शिरकाव केला. त्यांचा पाठलाग करता करता पोलीस देखील हॉलमध्ये पोहचले.

दरम्यान, ३ तास पोलीस आणि लुटारूंमध्ये चकमक सुरु होती. तरनतारनचे एसएसपी ध्रुमन निंबले हे स्वतः घटनास्थळी पोहचले होते आणि या चकमकीचा जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. शेवटी पोलिसांनी एका गुंडाचा खात्मा केला, तर चार जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या चकमकीत ८० राऊंड फायर केले. दुसरीकडे वर-वधू फुलांनी सजवलेल्या कारमध्ये बाहेर बसून वाट पाहत होते आणि आतून चकमकीचा आवाज ऐकू येत होता. यादरम्यान वऱ्हाडी मॅरेज पॅलेसबाहेर रेंगाळलेले दिसून आले. वर-वधू बाहेर कारमध्ये बसून वाट पाहत होते तर आतील गोळीबाराचा आवाज बाहेर ऐकू येत होता.

वधूचे आजोबा मन्ना सिंह यांनी सांगितले की, “त्यांच्या नातीचा विवाह सोहळा मॅरेज पॅलेसमध्ये होणार होता, त्यासाठी खूप आधी त्यांनी हॉल बुक केला होता. मात्र, ते जेव्हा पाहुण्यांसह तेथे पोहचले, तेव्हा दुसरेच चित्र समोर उभे राहिले. हॉलच्या बाहेर गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता तर पोलिसांचा चमू मोठ्या प्रमाणावर दाखल झाला होता.”