सिनेमात ‘रोमँटिक’ वाटतात पण प्रत्यक्षात खुपच ‘अवघड’ हे 6 KISS चे प्रकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आजकाल सिनेमात किसिंग सीन देणं कॉमन आहे. आजच्या काळात मेकर्स किसिंग सीन क्रिएटीव करताना दिसत आहेत ज्याबद्दल क्वचितच कोणी विचार केला असेल. अनेक प्रकारे किसिंग सीन क्रिएटीव दाखवले जाताना दिसत आहेत. अशाच काही किसिंग सीनबद्दल जाणून घेणार आहोत. जे दिसतात खूप सोपे आणि क्रिएटीव परंतु रिअल लाईफमध्ये खूप हार्ड आहेत.

1) मलंग – मोहित सुरी दिग्दर्शित सिनेमातील एक पोस्टर खूप चर्चेत राहिलं. बॉलिवूडमध्ये असे बोल्ड पोस्टर खूपच कमी पहायला मिळतात. आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनीचा किसिंग सीन असणारं हे पोस्टर खूप व्हायरल झालं होतं. दिशा आदित्यच्या खांद्यावर बसून त्याला किस करताना दिसली होती. हे पोस्टर युनिक होतं.

2) जलेबी – रिया चक्रवर्ती आणि वरुण मित्रा यांचा जलेबी सिनेमा 2019 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमातील एका लिपलॉक किसिंग सीननं खूप अटेंशन घेतलं. रियानं ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पडत वरुणला किस केलं होतं.

3) बफिक्रे – रणवीर सिंग आणि वाणी कपूर स्टारर हा सिनेमा चाहत्यांना जास्त पसंत नाही पडला. परंतु सिनेमातील एक पोस्टर प्रचंड व्हायरल झालं होतं. रणवीर आणि वाणीचा किसिंग सीन असणाऱ्या पोस्टरमध्ये दिसत होतं की, रणवीरनं वाणीला लिफ्ट केलं आहे आणि एका बाजूला झुकला आहे.

4) ओके जानू – आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर या सिनेमात तसे तर अनेक बोल्ड सीन होते. पंरतु लिपलॉक करताना श्रद्धानं मध्ये हात ठेवला होता आमि तिनं हातावरच किस केलं होतं.

5) रथम – साऊथ सिनेमात केवळ अ‍ॅक्सन सीनच अनोखे नसतात तर बोल्ड सीन्सही वेगळ्या अंदाजात शुट केले जातात. असंच काहीसं रथम सिनेमातील हा किसिंग सीन पाहिल्यानंतर वाटतं. या सिनेमातील किसिंग सीननं नक्कीच चाहत्यांना विचार करायला मजबूर केलं असेल की, अखेर हे सीन शुट कसे केले असतील.

6) काईट्स – हा सिनेमा फ्लॉप झाला होता. परंतु सिनेमात बोल्ड सीन्स आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. हृतिक रोशन आणि बारबरा मोरी यांनी सिनेमात अनेक लिपलॉक सीन दिले होते. हृतिकनं बेफिक्रेप्रमाणेच बारबराला लिफ्ट केलं होतं.

 

You might also like