लता मंगेशकरांची गाणी गाऊन ‘या’ महिलेने दिली टॉपच्या सिंगर्संना ‘टक्‍कर’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या काळात सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट असते पण काहींजवळ टॅलेंट हे गॉड गिफ्टच असते. असेच काही सिद्ध करणाऱ्या या नॉन सिंगर समोर आल्या आहे ज्यांनी भल्या-भल्या गायिकांना टक्कर दिली आहे. यांचा आवाज एकून सगळ्यांना नक्कीच आश्रर्य वाटणार आहे. या गायिका नसून एक सामान्य महिला आहे. ज्यांनी प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे एक प्रसिद्ध गाणे गायले आहे. त्यांच्या आवाजाने सगळ्यांना आकर्षित केले आहे.

1972 साली आलेले लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार के नगमा है’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. या गाण्याच्या सुरांची राणी लता मंगेशकर यांनी बरेच हृदय जिंकले होते. पण अलीकडेच या गाण्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे पण यावेळी हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले नसून पश्मिम बंगालच्या एका महिलेने गायले आहे. पश्चिम बंगालच्या रानाघाट स्थानकाजवळील एका महिलेने हे गाणे इतके सुंदर गायले आहे की, तिच्या व्हिडिओने कोट्यवधी लोकांचे लक्ष वेधून घेतले.

पश्चिम बंगालमधील महिलेचा हा व्हिडिओ बारपेटा टाऊन, प्लेस ऑफ पीस या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. या पेजचे मालक कृष्णदास जुबू यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले की, हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्टेशनवर शूट करण्यात आला होता. हा व्हिडिओ रानाघाटचे रहवासी निवादी तपना यांनी शूट करुन पाठविला होता.

या महिलेच्या व्हिडिओचे फेसबुकवर खूप कौतुक होत आहे. व्हिडिओबद्दल भाष्य करताना एका फेसबुक युजरने लिहिले की, ‘त्यांनी माझ्या डोळ्यांत अश्रू आणले आहेत. ते खूप सुंदर गात आहे.’ बंगालच्या या व्हिडिओला 21 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे आणि या व्हिडिओला ४ हजाराहून अधिक कमेंट आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –