काय सांगता ! होय, Lockdown मध्ये पुरूषांचा झाला अधिक छळ, तक्रारीत दीडपट वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) घरामध्ये पतीपत्नी (Husband Wife) बराच काळ एकत्र राहिल्याने त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरुन मोठ्या प्रमाणात वादविवाद झाले. त्यांच्या वादामध्ये नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढल्याने ही प्रकरणे अधिकच ताणली गेल्याने ती पोलिसांपर्यंत पोहचली. मागील वर्षीच्या तुलनेत यांदा महिलांच्या तक्रारी निम्म्याहून अधिक घटल्या आहेत. तर पुरुषांकडून आलेल्या तक्रारीत दीडपट वाढ झाली आहे.

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पुरुषांकडून करण्यात आलेल्या तक्रीत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. भरोसा सेलकडे (Bharosa Cell pune) 1 जानेवारी 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीत 544 पुरुषांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र यंदाच्या आकडेवारीत वाढ झाली असून यंदाच्या वर्षी याच कालावधीमध्ये 713 पुरुषांनी भरोसा सेलकडे तक्रार केली आहे. पत्नीकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी पुरुषांनी केल्या आहेत.

ऐरवी पुरुष कामाच्या निमित्ताने घराबाहेर रहात असल्याने घरातील बारिक सारीक गोष्टींकडे ते दुर्लक्ष करतात. परंतु कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पतीपत्नी बराच काळ एकत्र घरात राहिल्याने त्यांच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होऊ लागले. प्रत्येक गोष्टीत ते लक्ष घालत असल्याने त्यांच्यामध्ये खटके उडू लागले. यातून त्यांच्यमध्ये वाद वाढत गेल्याचे दिसून येत आहे.

एकमेकांबाबत संशय

एकमेकांबाबत संशय हा पुरुषांच्या आणि स्त्रीच्या अनेक तक्रारीचे मुख्य कारण असल्याचे दिसून आले आहे. एकमेकांचे नकळत मोबाईल चेक करणे, यातून दुसऱ्याविषयी संशय निर्माण होतो. तसेच पत्नी व तिच्या घरातील लोकांचा संसारामध्ये होणारा हस्तक्षेप हे देखील एक महत्वाचे कारण असल्याचे पुरुषांच्या तक्रारीत दिसून आले आहे. पतीपत्नीच्या भांडणात तोडगा निघावा हा पुरुषांनी केलेल्या अर्जामध्ये प्रमुख असल्याचे दिसून येते.

भरोसा सेलकडे आलेले एकूण अर्ज

व्हेंबर 2020 अखेर भरोसा सेलकडे एकूण 1744 अर्ज आले आहेत. यामध्ये 713 पुरुषांचे तर 1039 महिलांचे आहेत. एकूण आलेल्या अर्जांपैकी 682 अर्जांमध्ये समझोता झाला आहे.

नोव्हेंबर 2019 अखेर भरोसा सेलकडे एकूण 2808 अर्ज आले होते. यामध्ये पुरुषांचे 544 तर महिलांचे 2264 अर्ज आले आहेत. एकूण आलेल्या अर्जांपैकी 1233 अर्जांमध्ये समझोता झाला आहे.

अल्प काळातील सहवासात दोघांमध्ये वाढते वाद

स्त्री-पुरुषांकडून येणाऱ्या तक्रारीमध्ये सध्या लग्नानंतर अल्प काळातील सहवासात दोघांमध्ये वाद वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शुल्क कारणावरुन दोघांच्याही नातेवाईकांचा हस्तक्षेप होऊ लागल्याने ते पुढे वाढत जातात व त्यातून गैरसमज वाढत जाऊन वाद टोकाला पोहचतात. असे भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारीवरुन दिसून येत असल्याचे भरोसा सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शामने यांनी सांगितले.