Coronavirus : काय आहे कोरोनाची थर्ड वेव्ह, ज्यास घाबरत आहेत भारतीय; दुसरे देश असे करत आहेत बचाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतासह जगातील तमाम देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या तिसर्‍या लाटेने संकेत दिले आहेत. तिला तोंड देण्यासाठी अनेक देशात लॉकडाऊनसह अनेक प्रतिबंध वाढवले जात आहेत. कोरोना व्हायरसच्या तिसर्‍या लाटेबाबत म्हटले जात आहे की, ती तेव्हाच थांबेल जेव्हा सर्व लोक एकाच वेळी थांबतील. भारतात सध्या दुसर्‍या लाटेने कहर केला असताना तिसर्‍या लाटेच्या चर्चेने भिती आणखी वाढवली आहे. या तिसर्‍या लाटेबाबत जाणून घेवूयात…

काय आहे तिसरी लाट
डब्ल्यूएचओचे युरोपचे संचालक, हँस क्लूज यांनी सांगितले की, तिसर्‍या लाटेत व्हायरसचा नवा व्हेरियंट बी117 चे म्यूटेशन पहिल्यांदा युनायटेड किंगडममध्ये आढळले होते. असे म्हटले जाते की, हा मुळ व्हायरसच्या तुलनेत 50% जास्त संसर्गजन्य आणि जास्त घातक आहे. त्यांनी म्हटले की, व्हेरियंटचा प्रसार वाढत आहे. जर लोक सुरक्षित आणि नियंत्रित पद्धतीने राहिले नाहीत तर हा आणखी वेगाने वाढेल.

जर्मनीत फेब्रुवारीच्या अखेरीस शाळा पुन्हा उघडण्यात आल्या, तसेच सर्व प्रकारची दुकाने मार्चमध्ये उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे व्यापार पुन्हा सुरूकरण्याची परवानगी दिल्यानंतर, व्हायरसचे संकेत मिळू लागल्याने अंशता लॉकडाऊन लावला. आता तिसर्‍या लाटेनंतर हा लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा प्रयत्न आहे. येथे एका दिवसात 29,000 नवी प्रकरणे नोंदली गेल्यानंतर अनेक निर्णय घ्यावे लागले. येथे संक्रमित होणार्‍यांमध्ये बहुतांश 15 ते 49 वयोगटातील होते. तसेच 80-90 वर्षाच्या रूग्णांची संख्या सुद्धा वाढत आहे. आतापर्यंत येथे 80,000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तर फ्रान्समध्ये एप्रिलच्या सुरुवातीला राष्ट्रीय लॉकडाऊन लावला गेला. तरीसुद्धा येथे कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली. येथे सर्व शाळा, दुकाने एप्रिलच्या अखेरपर्यंत बंद केली होती आणि सायंकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला. येथे व्हॅक्सीन वेगाने सुरू आहे.

इटलीत सुद्धा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रूग्णांची संख्या सरासरी वाढली आहे. येथे सुद्धा सरकार लसीकराने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. येथे एप्रिलपर्यंत 1 लाख 15 हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.

नेदरलँड सरकारने एप्रिलच्या अखेरपर्यंत लॉकडाऊन शिथिल करणार नसल्याचे सांगितले होते. स्थिती बिघडल्यानंतर येथे पुन्हा सर्व प्रतिबंध लावण्यात आले. तर पोलंड सरकारने देशव्यापी कोविड-19 लॉकडाऊन सुरू ठेवला आहे. येथे एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत 2,621,116 प्रकरणे नोंदली गेली. जगभरातील देश अशाप्रकारे तिसर्‍या लाटेच्या संकेताने प्रचंड तणावात असताना भारतात लसीकरण अतिशय संथ गतीने सुरू आहे. येथे अनेक ठिकाणी लसीची टंचाई भासत आहे. यामुळे येथे तिसर्‍या लाटेची भिती व्यक्त होऊ लागली आहे. भारतात देशव्यापी लॉकडॉन नसला तरी राज्य सरकारे आपल्या स्तरावर प्रतिबंध लावत आहेत. लोक स्वताहून देखील आपल्या घरात बंद राहण्याचा प्रयत्न करत आहेत.