Coronavirus Test : RT-PCR टेस्टमधील CT Value म्हणजे काय ती किती महत्वाची आहे? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. अनेक राज्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. मागिल काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत घट होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे RT-PCR Test करणाऱ्या यंत्रणावर दबाव वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर टेस्टमधील सायकल थ्रेशोल्ड (Cycle Threshold) म्हणजे सीटी व्हॅल्यू (CT Value)सध्याची मर्यादी कमी करावी, अशी मागणी महाराष्ट्र शासनाने आयसीएमआरकडे केली होती. मात्र महाराष्ट्र सरकारची ही मागणी आयसीएमआरने फेटाळून लावली आहे.

राज्य सरकारचा असा तर्क आहे की, सीटी व्हॅल्यू मर्यादा कमी केली तर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होईल. मात्र ही व्हॅल्यू कमी केली तर गोंधळाची स्थिती निर्माण होईल यामुळे अनेक रुग्ण यामधून वगळले जातील, असे आयसीएमआरचे म्हणणे आहे. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, सीटी व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय ? ती किती महत्वाची आहे ? सीटी व्हॅल्यू कमी जास्त झाली तर याचा परिणाम कोरोना रिपोर्ट काय होते ? जाणून घ्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे.

सीटी व्हॅल्यू म्हणजे काय ?

RT-PCR Test मधील CT Value रुग्णातील विषाणू लोड म्हणजे व्हायरस लोड दाखवते. अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल केमिस्ट्रीच्या (AACC) मते सीटीचा अर्थ असा की विषाणूच्या आरएनएची तपासणी करण्याच्या पातळीवर पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली चक्रसंख्या होय. सीटी व्हॅल्यू कमी असेल तर रुग्णाच्या नमुन्यात व्हायरल आरएनएची संख्या जास्त आहे, असे समजले जाते.

सीटी व्हॅल्यूच्या संख्येवर रुग्ण कोरोना बाधित आहे की नाही हे समजते. जर एखाद्या रुग्णाची सिटी व्हॅल्यू 35 दाखवत असेल तर तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे असे समजले जात नाही. मात्री ही व्हॅल्यू 35 पेक्षा कमी असलेल तर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह समजला जातो. ज्यावेळी सीटी व्हॅल्यू कमी दाखवली जाते त्यावेळी रुग्णाची स्थिती अधिक गंभीर आहे असे समजले जाते.

सध्याच्या गाईडलाईन्सनुसार 35 किंवा त्यापेक्षा कमी सीटी व्हॅल्यू असेल तर तो रुग्ण कोरोना बाधित मानला जातो. 23 ते 25 दरम्यान हॉल्यू असेल तर रुग्णची स्थिती धोक्याच्या बाहेर आहे असे समजले जाते. 22 पेक्षा कमी असेल तर रुग्णाला काळजी घ्यावी लागते आणि हीच व्हॅल्यू जर 15 पेक्षा कमी असेल तर रुग्णाला ऑक्सिजन बेडची आणि 10 पेक्षा कमी असेल तर आयसीयू बेडची गरज भासते.

सीटी व्हॅल्यूची उपयुक्तता काय ?

सीटी व्हॅल्यूमुळे रुग्णाच्या जोखमीची माहिती मिळते. ही व्हॅल्यू कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला देखील प्राधान्य देण्यास मदत करते. अनेक पॅथॉलॉजी लॅबमध्ये याची तपासणी होत नसल्याने रिपोर्टमध्ये ही व्हॅल्यू दर्शवली जात नाही. याशिवाय क्लिनिक संशोधकांना सीटी व्हॅल्यूच्या आधारे कोविड-19 संक्रमित प्रकरणांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार नाही.

सीटी व्हॅल्यूला काही मर्यादा आहेत का ?

सीटी व्हॅल्यूमुळे रुग्ण किती अत्यावस्थ आहे याचा अंदाज लावला जातो. रुग्णाकडून नमुने घेण्याची पद्धत, स्त्रोत, प्रवास आणि संक्रण किंवा नमुना घेण्याची वेळ या व्हॅल्यूच्या विश्लेषणावर अवलंबून असते. मात्र हा ठोस पुरवा मानला जात नाही.

रुग्णाची सद्य:स्थिती म्हणजे जुने आजार, सध्याचे लक्षणे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कमी सीटी व्हॅल्यू असलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर झालेली नसते किंवा जास्त व्हॅल्यू असलेल्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाल्याचंही दिसून आलं आहे. त्यामुळे सीटी व्हॅल्यू वर सगळं अवलंबून नसते.