तुम्ही सुद्धा ग्लासऐवजी बाटलीने पाणी पिता का? :या’ 3 योग्य पद्धती जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते नुकसान

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आपल्या शरीरातील सर्व अवयव चांगल्या प्रकारे काम करत राहावेत यासाठी शरीरात पाणी असणे खुप आवश्यक आहे. विशेषता उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्याने डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या होतात. शरीरात बॅक्टेरिया, व्हायरससारखे इन्फेक्शन झाल्यास सुद्धा डॉक्टर जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र, पाणी पिण्याची सुद्धा योग्य पद्धत आहे, चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास नुकसान होऊ शकते. या पद्धतींविषयी जाणून घेवूयात…

बसून प्या पाणी
आयुर्वेदात म्हटले आहे की, उभे राहून पाणी प्यायल्याने नुकसान होते. यामुळे शरीरात द्रव पदार्थाचा बॅलन्स बिघडतो. यामुळे सांधेदुखी होऊ शकते. मात्र, यावर डॉक्टर सहमत नाहीत.

ग्लासने प्या पाणी
ग्लासने घोट-घोट घेत पाणी प्यावे. बाटलीने पाणी कमी प्यायले जाते. ग्लास पूर्ण रिकामा केला जातो. पाण्याचा एक घोट घ्या, तो गिळल्यानंतर पुन्हा श्वास घ्या. आयुर्वेदात हीच योग्य पद्धत सांगितली आहे.

जास्त थंड पाणी पिऊ नका
खुप थंड पाणी प्यायल्याने डायजेशनची प्रक्रिया डिस्टर्ब होते. कोमट पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात. पाणी जास्त थंड असू नये, किंवा जास्त गरम असू नये तर खोलीच्या तापमानाएवढे असावे. जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या. रोज अडीच ते तीन लीटर पाणी प्या.