हे काय… नोकरीच्या शेवटच्या दिवशी आॅफिसला चक्क घोड्यावरुन

बंगळुरु : वृत्तसंस्था

सोशल मीडियावर रोज काही ना काही हटके बघायला मिळतं.आणि या माध्यमामुळे रातो-रात एखादी व्यक्ती फेमस होते. काहि दिवसापुरर्वी असेच डांन्सीेग काका सोशल मीडियावर चर्चेत आले होते.सध्या बंगळुरमधील एक साॅफ्टवेअर इंजिनिअर असाच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. रुपेश कुमार वर्मा असे या इंजिनिअर ची आेळख असून, ते चर्चेत राहण्याचे कारण असे की, रुपेश यांनी आपल्या आॅफिसचा शेवटचा दिवस लक्षात रहावा यासाठी तो चक्क आॅफिसला घोड्यावरच गेला. अशा प्रकारे आॅफिसला घोड्यावर गेल्याचा व्हिडिआे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

नविन व्यवसाय सुरु करण्यासाठी रुपेश कुमार यांनी अापली नोकरी साेडली आहे. बंगळुरु येथिल EGL या कंपनीत रुपेश कुमार वर्मा साॅफ्टवेअर इंजिनिअर होते. त्यांचे घोडा घेऊन आॅफिसला जाण्याचे कारण काय? तर, शहरातील वाढलेल्या ट्रॅफिकचा निषेध करण्यासाठी आपण घोड्यावरुन आॅफिसला जात असल्याचे रुपेशने सांगितले .पुढे ते असेही म्हणाले, ट्रॅफीकला वैतागून मी घोडेस्वारी शिकलो.निळा शर्ट, पँट,शूज,फाॅर्मल कपडे अाणि पाठीवर आॅफिस बॅग घेतल्याचे या व्हिडियोमध्ये बघायला मिळते. साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करण्याचा शेवटचा दिवस अशी पाटी घोड्यावर त्याने लावली. तेव्हा निषेध करण्याचा हा अनोखा अंदाज नेटकऱ्यांना खुपच भावला त्यामुळे रुपेश वर्मा चांगलेच चर्चेत आले.दरम्यान या व्हिडियोचे काहिंंनी काैतुक तर काहींनी खिल्लीही उडवली.