आता व्हॉट्सअॅप स्टेट्स वरील व्हिडीओ करता येणार डाउनलोड  

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था 
सोशल नेटवर्किंग साईटस पैकी ‘व्हॉट्स अॅप’ च्या लोकप्रियतेने शिखर गाठले आहे . व्हॉट्स अॅप ने मागील वर्षीपासून स्टेट्स स्टोरी ठेवण्यासाठी नवीन फिचर चालू केले . या फीचरची देखील भन्नाट चलती आहे. सोशल नेटवर्कींग साईटमधील फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअॅपवर रोज लोक हजारो प्रकारच्या स्टोरीज शेअर करत असतात. या फीचरमध्ये आपण कुठलीही स्टोरी २४ तासासाठी ठेऊ शकतो. त्यामध्ये एखादा आपल्याला आवडलेला फोटो किंवा ३० सेकंदापर्यंतचा एखादा व्हिडीओ आपण स्टेटस स्टोरी म्हणून ठेऊ शकतो.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’240763ad-adc0-11e8-86f4-4b47dc42e80e’]

 व्हॉट्सअॅपवर हे फीचर चालू होऊन जवळपास एक वर्ष  झाले .दिवसेंदिवस या फीचरची लोकप्रियता ‘वाढता वाढता वाढे’ अशीच आहे. व्हॉट्सअॅप वरील या फीचरमधील कोणाचाही एखादा स्टेट्स फोटो किंवा ईमेज असेल तर स्क्रिन शॉट करून घेऊ शकतो मात्र व्हिडिओच्या बाबतीत असे होत नाही . पण आता  एखाद्याचा स्टेट्स  व्हिडीओ  देखील डाउनलोड करता येणार आहे.

घरच्याचा विरोधाला झुगारत ती बनली पहिली महिला वैमानिक

व्हाट्सअॅप स्टेटस स्टोरी डाऊनलोड करण्यासाठी आता वेगवेगळे अॅप आले आहेत. एखादे असे अॅप घेऊन आपण सहज कोणाच्याही व्हाट्सअॅप स्टोरीचा व्हिडीओ डाऊनलोड करु शकतो. सध्या ‘Story Saver for Whatsapp’ हे सर्वांना परिचीत असलेले अॅप आहे. या व्यतीरिक्त गुगल प्ले स्टोअरवर अशा स्वरुपातील अनेक अॅप उपलब्ध आहेत. हे अॅप वापरून तुम्ही सहज तुम्हाला आवडलेला व्हिडीओ डाऊनलोड करु शकता.