व्हाट्सअॅपचे नवीन फिचर; आता गॅलरीतील फोटो, व्हिडिआे लपवता येणार!

मुंबई: पोलीसनामा आॅनलाइन

व्हाट्सअॅपने ‘मीडिया व्हिजीबिलीटी’ नावाचे एक नवीन फीचर लाॅंच केले आहे. याद्वारे व्हाट्सअॅपवर आलेले फोटो, व्हिडिआे किंवा जीफ फाईल्स यांसाखे मीडिया कंटेंट गॅलरीमध्ये हाइड करता येणार आहेत.

व्हाट्सअॅपवर आलेले अनेक फोटो, फाईल्स आपल्याला नको असतात. ते आपण गॅलरीमधून डिलीट करत असतो. मात्र ‘मीडिया व्हिजीबिलीटी’ या फीचरमुळे व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या फाईल्स आपल्याला गॅलरीत हव्या आहे की, केवळ व्हॉट्सअॅपवर ठेवायच्या आहेत हे ठरवता येणार आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी ‘मीडिया व्हिजीबिलीटी’ हा ऑप्शन डिसेबल केल्यास फाईल्स गॅलरीत दिसणार नाही. पण फाईल मॅनेजरमध्ये दिसू शकतील. तसेच ‘काॅन्टॅक्ट शाॅर्टकट’ या फिचरमध्ये व्हाॅट्सअॅपवर काॅन्टॅक्ट अॅड करता येऊ शकतात. नवीन ग्रुप तयार करताना, त्या सदस्याचा काॅन्टॅक्ट नंबर मोबाईलमध्ये सेव्ह असणे गरजेचे होते, मात्र या फिचरमुळे व्हाॅट्सअॅपवर नवीन काॅन्टॅक्ट तयार करता येतो.

‘मीडिया व्हिजीबिलीटी’ हे नवीन फीचर व्हॉट्सअॅप अॅन्ड्रॉइड बीटा अॅपच्या २.१८.१९५ व्हर्जनवर उपलब्ध होणार आहे.