‘WhatsApp’च्या ‘या’ 5 ट्रिक जाणून घ्या, स्वतःला ‘Expert’ समजाल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग ऍप म्हणून व्हाट्सअप ओळखले जाते. हे ऍप न वापरणारा व्यक्ती तुम्हाला सापडणे अवघड आहे. मागील काही वर्षांपासून आपण व्हाट्सअप वापरात आहोत. त्यामुळे तुम्हाला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सोपा मार्ग उपलब्ध झाला आहे. मात्र इतक्या वर्षांनंतर देखील तुम्हाला यातील अनेक फीचर्सची माहिती नसेल. आज आम्ही तुम्हाला या ऍपच्या विषयी पाच ट्रिक्स सांगणार आहोत. यामुळे तुम्ही स्वतःला व्हाट्सअप एक्सपर्ट समजायला लागल.

या आहेत पाच व्हाट्सअप ट्रिक

1) Status Hide-
जर तुम्हाला तुमचे स्टेटस कुणी पाहू नये असे वाटतं असेल तर तुम्हाला हे देखील लपवता येते. त्यासाठी व्हाट्सएपच्या सेटिंगमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. तुम्ही सेटिंगच्या  Status Privacy मध्ये गेल्यानंतर तुम्ही नको त्या लोकांना स्टेटस पाहण्यापासून रोखू शकता.

2)Mute Group Chat
अनेक प्रकारचे ग्रुप असल्यामुळे तुम्हाला सतत नोटिफिकेशन्स पडत असतात. त्यामुळे तुम्ही याच्या त्रासापासून वाचण्यापासून  ग्रुप चॅट म्यूट देखील करू शकता.

3)Disable Blue Tick
हे फिचर केवळ सुरक्षेच्या दृष्टीने बनविण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही पाठवलेले संदेश वाचले गेले आहेत कि नाही याची तुम्हाला माहिती मिळण्यासाठी  याचा वापर करण्यात येतो. मात्र हेदेखील तुम्ही बंद करू शकता. Read Receipt नावाचा पर्याय तुम्ही Disable  केल्यानंतर तुम्ही मॅसेज वाचले आहेत कि नाही याची माहिती कुणालाही मिळणार नाही.

4)Hide Last Scene
हे देखील फिचर लपवण्याचा पर्याय तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे. तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन Last Seen या पर्यायाला Nobody असे केल्यानंतर तुम्ही किती वेळापूर्वी ऑनलाईन होता याची माहिती कुणालाही मिळणार नाही.

5)Share Live Location
जर तुम्ही कोणत्या अनोळखी ठिकणी अडकला आहात आणि तुम्हाला मदतीची गरज आहे तर तुम्ही व्हाट्सएपच्या Share Live Locationच्या मदतीने कुणालाही पत्ता पाठवून याठिकाणी येण्यास मदत करू शकता.