व्हॉट्सअ‍ॅप बनले आणखी IMPORTANT… विम्याची कागदपत्रे थेट होणार व्हॉट्सअ‍ॅप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्याच्या जमान्यात व्हॉट्सअॅप केवळ चॅटिंग एवढेच मर्यादित राहिले नाही तर काही महत्वाच्या गोष्टी जसे की प्रमाणपत्र वगैरे देखील सहजच व्हॉट्सअ‍ॅप द्वारे शेअर केले जाते. आता या व्हॉट्सअ‍ॅप माध्यमातून लोकांना विविध सेवा-सुविधा देण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी बुकमायशोवर काढलेली तिकीटे प्रेक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली जायला लागली. आता भारती एक्सा लाईफ इन्शुरन्सने विमा पॉलिसीच्या पावत्या आणि क्लेम थेट तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवायला सुरुवात केली.

भरती एक्सा लाईफ इन्शुरन्स कडून व्हॉट्सअ‍ॅप या माध्यमाचा पुरेपूर वापर करण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून  कंपनीकडून पॉलिसीची कागदपत्रे, प्रिमिअम पावत्या पाठवण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारेव्हॉट्सअ‍ॅप सेवा देणारी ही पहिलीच विमा कंपनी असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत बोलताना भारती एक्सा लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक विकास शेठ म्हणाले की,  विमा पॉलिसीचा करार, पॉलिसीच्या नूतनीकरणाची कागदपत्रे, क्लेमसंदर्भातील माहितीव्हॉट्सअ‍ॅप वर दिली जाईल. कंपनीकडून ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. त्यापैकीच एक व्हॉट्सअ‍ॅप, असेल. यासह इतरही माध्यमातून आमचे प्रतिनिधी ग्राहकांपर्यंत पोहोचतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तंत्रज्ञानावर आधारित संवाद आजच्या काळात खूप महत्त्वाचा झाला आहे. लोकही या पद्धतीच्या संवाद प्रक्रियेत पटकन सहभागी होतात. त्यामुळे ग्राहकांपर्यंत त्यांच्यासाठी महत्त्वाची असलेली कागदपत्रे लवकर पोहोचविण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप महत्त्वाचे माध्यम आहे. आमच्या ग्राहकांशी संपर्क ठेवण्यासाठी आणि त्यांना तात्काळ सुविधा पुरविण्यासाठी आम्ही व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले.