१ जुलैपासून ‘या’ स्मार्टफोनमध्ये ‘WhatsApp’ वापरता येणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. १ फेब्रुवारी २०२० पासून वॉट्सअप मध्ये मोठे बदल होणार आहेत. अँड्रॉइड वर्जन २. ३. ७ आणि त्याच्या आधीचे ऑपरेटिंग सिस्टीम , iOS ७ आणि त्याच्यापेक्षा जुने सिस्टीमवर आता तुम्हाला वॉट्सअप वापरता येणार नाही.

एक फेब्रुवारी २०२० पासून तुम्हाला या प्रणालीवर आधारित असणारे वॉट्सअप वापरता येणार नाही. याविषयी कंपनीने आपल्या अधिकृत पेजवर माहिती दिली आहे. मात्र तुमचा फोन जर सहा वर्षांपेक्षा जुना असेल तरच तुमचे वॉट्सअप बंद होऊ शकते. त्यामुळे नवीन फोन असणाऱ्यांनी याची काळजी करण्याची गरज नाही.

या ब्लॉगमध्ये लिहिण्यात आले आहे कि, ३१ डिसेंबर २०१९ पासून विंडोज या प्रणालीवर चालणाऱ्या फोनमधील वॉट्सअप बंद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या प्रणालीवर चालणारे वॉट्सअप १ जुलैपासून Windows Store वरून हटवण्यात येणार आहे.

एका रिपोर्टनुसार जगभरातील केवळ ०. २४ टक्केच लोकं या प्रणालीचा वापर करत आहेत. सध्या वॉट्सअप अँड्रॉइडच्या ४.०.३ या प्रणालीवर काम करत आहे. त्यामुळे या प्रणालीपेक्षा जुन्या प्रणालीवर चालणारे सर्व वॉट्सअप बंद होणार आहेत.

दरम्यान,या प्रणालीव्यतिरिक्त सर्व प्रणालींचे वॉट्सअप बंद होणार असून ग्राहकांनी नवीन प्रणालीवरील फोन घेण्याचे आवाहन वॉट्सअपने आपल्या ग्राहकांना केले आहे.

आरोग्य विषयक वृत्त

पुण्यात ‘डॉक्टर्स डे’ निमित्त ३० जून रोजी सन्मान सोहळा

तणावग्रस्त महिलांना मासिक पाळीत होतो जास्त त्रास

‘केस’ धुताना घ्या ही काळजी

या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉँगटर्म’ फायदे