भारतात ‘WhatsApp Pay’ लाँच, झुकरबर्ग-अंबानींची ‘डिजिटल इंडिया पे चर्चा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   भारतात गेल्या दोन वर्षापासून WhatsApp Pay Beta उपलब्ध आहे. परंतु परवानगी न मिळाल्यामुळे हे अधिकृत लाँच करण्यात आले नव्हते. आता भारतात व्हॉट्सअ‍ॅप पे लाँच करण्यात आले आहे. गेल्याच महिन्यात अ‍ॅपचे लाँचिंग झाल्याचे फेसबुकचे संस्थापक आणि व्हॉट्सअ‍ॅपचे मालक मार्क झुकरबर्ग (Zukerberg) यांनी सांगितलं. डिजिटल इंडिया (Digital India) या प्लॅटफॉर्मवर संवाद साधताना मार्क यांनी इंडियाचे प्रमुख मुकेश अंबानींशी (Mukesh Ambani) चर्चा केली. यावेळी यासंदर्भात माहिती दिली.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने WhatsApp Pay ला भारतात लाँच करण्यासाठी परवानगी दिली आहे. यानंतर, काही टप्प्यात हे लाँच केले जात आहे. तसेच मार्क झुकरबर्ग यांनी भारतात गेल्याच महिन्यात व्हॉट्सअप पे लाँच केल्याची माहिती दिली. पार्टनरींग फॉर डिजिटल इंडियाद्वारे रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्याशी झुकरबर्ग यांनी संवाद साधला. यावेळी भारतात व्हॉट्सअप पे लाँच केल्याचे सांगत, केवळ युपीए UPA) कार्यप्रणाली आणि 140 बँकांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले आहे. भारतात असे प्रयोग करायला भारत हा प्राधान्यक्रमाने पहिला देश ठरतो, असेही झुकरबर्ग यांनी म्हटलं.

दरम्यान, WhatsApp Payment भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 400 मिलियन युजर्सला सेफ ट्रान्जक्शन करण्यात मदत करु शकते, असे यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅप पे च्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी WhatsApp गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे WhatsApp आणि Jio मिळून व्हॉट्सअप पे अ‍ॅपवर काम करत आहेत.