‘WhatsApp’ नं बदललं नाव, लवकरच तुमच्या स्मार्ट फोनमध्ये दिसणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे मॅसेजिंग ऍप व्हाट्सअ‍ॅपचे नाव बदलण्यात आले असून कंपनीने नवीन रूपात आपल्या ग्राहकांसमोर आणले आहे. आता यापुढे व्हाट्सअ‍ॅपचे नाव ‘WhatsApp from Facebook’ असे असणार आहे. आतापासूनच काही युजर्सच्या अकाउंटला हे नाव दिसत असून उर्वरित युजर्सला देखील हे नाव लवकरच दिसणार आहे. युजर्सने एक फोटो शेयर केला असून यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल.

image.png

फेसबुकने मागील काही वर्षांपूर्वी व्हाट्सअ‍ॅप खरेदी केले आहे. त्यानंतर आता त्यांनी याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकच्या मालकीचे हे ऍप असले तरी त्यामध्ये फेसबुकचा कोणताही उल्लेख नव्हता. त्यानंतर कंपनीच्या वतीने देखील याची पुष्टी करण्यात आली असून इंस्टाग्रामचे देखील नाव बदलण्यात येणार आहे. लवकरच व्हाट्सअ‍ॅपच्या धर्तीवर इंस्टाग्रामचे नाव देखील ‘Instagram from Facebook’ असे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लवकरच फेसबुक इंस्टाग्रामवर देखील जाहिरात करण्यास सुरुवात करणार आहे.

दरम्यान, व्हाट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असून लवकरच आणखी काही फीचर्स ग्राहकांच्या भेटीसाठी येणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त-

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like