आता इन्स्टाग्रामचं ‘हे’ फिचर ‘WhatsApp’ मध्ये येणार

मुंबई : पोलीसानामा ऑनलाईन – सध्या व्हॉट्सअ‍ॅपचे युझर्स अधिक आहेत. त्यामुळे रोज नवनवीन फिचर अपडेट केले जातात जे ग्राहकांसाठी उपयुक्त असतात. आता व्हॉट्सअ‍ॅपने नवीन फिचर आणले आहे. या फिचरमुळे ग्राहकांना इन्स्टाग्रामसारखे बुमरँग व्हिडिओ बनवता येणार आहेत. ग्राहकांना इन्स्टाग्रामवरील बुमरँग हे फिचर फार आवडते. त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅपने हे फिचर आणले असावे.

या फिचरच्या मदतीनं व्हॉट्सअ‍ॅप युजर्स बुमरँग व्हिडिओ तयार करून मित्रांना पाठवता येणार आहे. तसंच हे बुमरँग व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्येही ठेवता येणार आहे.

असं काहीसे असणार आहे हे फिचर

या बुमरँग फिचरमध्ये व्हीडिओ हा ७ सेकंदाचा असणार आहे. या व्हीडिओचे रुपांतर जीआयएफमध्ये करू शकतो. काही महिन्यांपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपने हे फिचर लाँच केले. यासाठी व्हीडिओ एडिटमध्ये पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. हे नवीन फिचर आधी आयओएस स्मार्टफोनमध्ये दिसेल. त्यानंतर सामान्या अँड्रोइड ग्राहकांसाठी हे फिचर अपडेट केलं जाईलं.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपने फिचर लाँच करणार याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. तसंच व्हॉट्सअ‍ॅप बुमरँग फिचरबरोबरच आणखी एक फिचर आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –