Whatsapp मध्ये नोट्स बनवणे, डॉक्यूमेंट आणि लिंक सेव्ह करण्यासाठी ‘या’ आहेत ट्रिक्स, दुसर्‍यांना नाही पाठवावे लागणार मॅसेज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअपमध्ये अनेक लोक महत्वाचे मॅसेज, आवश्यक लिंक, इमेज किंवा एखादे डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी आपला भाऊ, मित्र किंवा घरातील इतर सदस्याला मॅसेजच्या स्वरूपात पाठवतात, जेणेकरून जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा पुन्हा मिळवता येतील. यासाठी तुम्हाला स्वत:शी चॅट करण्याचा पर्याय शिकून घ्यावा लागेल. यासाइी स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस जाणून घेवूयात…

व्हॉट्सअपमध्ये असे करा स्वत:शी चॅट
इंस्टंट मॅसेजिंग अ‍ॅपमध्ये स्वत:शी चॅटिंग करण्यासाठी दोन प्रोसेस दिल्या आहेत, ज्यापैकी पहिली प्रोसेस कम्प्यूटरवरून पूर्ण होते, तर दुसरी प्रोसेस मोबाईल फोनवरून करू शकता.

पहिली पद्धत ब्राऊजरची
पहिल्या प्रक्रियेत क्रोम ब्राऊजरवर जा. यानंतर अ‍ॅड्रेस बारमध्ये wa.me// टाईप करा, नंतर आपला कंट्री कोड (भारताचा कंट्री कोड 91 आहे) टाकून तुमचा मोाबईल नंबर टाईप करा. यानंतर ब्राऊजर मध्ये wa.me//91XXXXXXXXXX (एक्सच्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर असेल) अशाप्रकारे लिहिलेले दिसेल. आता सर्च करा किंवा एंटरवर क्लिक करा.

यानंतर ब्राऊजरमध्ये डाऊनलोड किंवा व्हॉट्सअप वेब लिहिलेले दिसेल. व्हॉट्सअप वेब वर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर स्वत:शी चॅटिंग उघडलेले दिसेल. यानंतर Hi लिहून मॅसेज करा. आता तुम्ही तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअप उघडा, त्यामध्ये तुम्हाला स्वत:चे चॅटिंग दिसेल.

दुसरी पद्धत मोबाईलची
व्हॉट्सअपमध्ये स्वत:शी चॅट करण्याची दुसरी पद्धत मोबाईलची आहे. यासाठी तुम्हाला कुणा एखाद्या व्यक्तीशी ग्रुप बनवावा लागेल. ग्रुप बनवल्यानंतर त्या दुसर्‍या कॉन्टॅक्टला ग्रुपमधून काढून टाका. असे केल्याने त्या ग्रुपमध्ये केवळ तुम्हीच रहाल आणि नंतर त्याचा वापर तुम्ही तुमचे महत्वाचे मॅसेज, आवश्यक लिंक, इमेज किंवा डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी करू शकता.