Whatsapp Voice Call Recording | ‘व्हॉट्सअ‍ॅप कॉल’ करायचा असेल रेकॉर्ड, तर जाणून घ्या कोणत्या पद्धतीने करू शकता हे काम?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Whatsapp Voice Call Recording | ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा वापर सध्या प्रत्येकजण करत आहे. कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रांच्या देवाण-घेवाणपासून कोणतीही सिक्रेट चर्चासुद्धा WhatsApp द्वारे केली जात आहे. मेसेजशिवाय याद्वारे कॉलिंगची सुद्धा सुविधा दिली जाते, जी एकदम मोफत आहे. अशावेळी जर एखादा महत्वाचा कॉल रेकॉर्ड (Whatsapp Voice Call Recording) करण्याची गरज पडली तर अनेक लोकांना व्हॉट्सअपचा कॉल रेकॉर्ड करता येत नाही. व्हॉट्सअप कॉल कसा रेकॉर्ड करावा ते जाणून घेवूयात.

 

Android वर WhatsApp कॉल रेकॉर्ड

 

जर तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये व्हॉईस रेकॉर्डर असेल, तर याचा वापर व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करण्यासाठी सुद्धा करू शकता. एकदा तुमचा कॉल लाईव्ह झाल्यावर फोनचा व्हॉईस रेकॉर्डर उघडून रेकॉर्ड करू शकता.

 

मात्र, हे लक्षात ठेवा की फोन स्पीकरवर असल्यास स्पष्ट आवाज रेकॉर्ड होईल. जर तुमच्या फोनमध्ये व्हॉईस रेकॉर्डर नसेल तर तुम्ही
Google Play Store वरून Google चे रेकॉर्डर अ‍ॅप किंवा क्यूब कॉल रेकॉर्डर नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.
क्यूब कॉल अ‍ॅप आयओएस डिव्हाईसवर काम करणार नाही. (Whatsapp Voice Call Recording)

 

क्यूब कॉल अ‍ॅपद्वारे असे करू शकता रेकॉर्ड

 

  • सर्व प्रथम आपण क्यूब कॉल रेकॉर्डर डाऊनलोड करा.
  • अ‍ॅप ओपन केल्यानंतर व्हॉट्सअपवर जा आणि यानंतर त्या व्यक्तीला कॉल करा ज्याच्याशी तुम्हाला बोलायचे आहे.
  • जर यादरम्यान तुम्हाला क्यूब कॉल व्हिजेट दिसत असेल तर याचा अर्थ कॉल रेकॉर्ड होत आहे.

 

Iphone वर WhatsApp कॉल रेकॉर्ड

 

  • अ‍ॅप्पल थर्ड-पार्टी अ‍ॅप्स एकाच वेळी मायक्रोफोन आणि एक फोन अ‍ॅपपर्यंत पोहचण्यास परवानगी देत नाही.
    ज्यामुळे तुमच्या Iphone वर स्क्रीन रेकॉर्ड फिचर आणि व्हॉईस मेमो रेकॉर्डरचा वापर करता येणार नाही.
  • याशिवाय, कोणतेही अ‍ॅप स्टोअर अ‍ॅप नाही जे कॉल रेकॉर्डिंग करते. यासाठी रेकॉर्डिंगसाठी तुम्हाला पर्यायी रूपाचा वापर करावा लागेल.
    तुम्ही दुसरा फोन किंवा मॅकबुकची मदत घेऊ शकता.

 

Web Title : Whatsapp Voice Call Recording | want to record whatsapp voice call know in what ways you can do this work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sarthi Pune | प्रत्येक जिल्ह्यात संगणक आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण देणार – ‘सारथी’चे अध्यक्ष अजित निंबाळकर

Unified DCPR Maharashtra | खुशखबर ! 1 जानेवारी 2022 पासून राज्यभरात बांधकामांना ऑनलाईन परवानगी

Rakhi Sawant | 2 वर्षानंतर भेटलेल्या पतीसोबत राखी सावंत Bigg Boss मध्येच करणार ‘सुहागरात’