वयाने लहान असलेल्या अर्जुनला डेट करत असल्याच्या प्रश्नावर मलाय़काने दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री मलाइका अरोरा अर्जुन कपूर यांचे नाते नेहमीच चर्चेत असते. याबाबत मलायकाला बर्‍याचदा प्रश्न विचारला जातो की ती तिच्यापेक्षा दहा वर्षापेक्षा लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघांच्या वयामध्ये प्रचंड अंतर असल्यामुळे अनेकांनी विविध मतमतांतरे केली. त्यांना साशल मीडियावर अनेक वेळा ट्रोलही केले जाते. मात्र याचे मलायकाला काही देणेघेणे नाही. तसे, मलायका यापूर्वी या विषयावर अनेकदा उघडपणे बोलली आहे. आताही ती म्हणाली, पुरुष जेव्हा पुढे निघून जातो तेव्हा काही फरक पडत नाही, परंतु जेव्हा एखादी स्त्री तसे करते ते तेव्हा पाप आहे, का ?’ जेव्हा एखादा माणूस त्याच्यापेक्षा लहान असलेल्या महिलेला डेट करतो, तेव्हा लोक त्याला ड्यूड म्हणतो, परंतु जर एखादी स्त्री तिच्यापेक्षा लहान मुलाला डेट करते तेव्हा सगळ्यांना ते खटकते.

यापूर्वी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मलाइका म्हणाली की, ‘नेहमीच हा भेदभाव होत आला आहे. हे वाईट आहे आणि मला आशा आहे की यात बदल होईल. बरेच काही बदलत आहे परंतु तिथे पोहोचायला अजून थोडा वेळ लागेल.

2019मध्ये ऑफिशल केल होते रिलेशनशीप
मलायका अरोराने 2019 मध्ये अर्जुन कपूरच्या वाढदिवशी त्यांच नांत ऑफिशल केले होते. मलायकाने अर्जुनबरोबर तिचा फोटो पहिल्यांदा इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तसे, मलायका आणि अर्जुन यापूर्वीही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते, परंतु तोपर्यंत त्यांनी हे स्वीकारलेले नव्हते की ते एकमेकांना डेट करत आहेत.