White Hair | सकाळी-सकाळी करा ‘या’ गोष्टींचा 5 प्रकारे वापर, केस पांढरे होण्याच्या समस्येपासून होईल सुटका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – White Hair | सध्याच्या युगात पांढर्‍या केसांची समस्या इतकी सामान्य झाली आहे की प्रत्येक वयोगटातील लोक त्याला बळी पडतात. कमी वयात केस पिकल्यामुळे अनेकजण टेन्शन, स्ट्रेस (Tension, Stress), लाजिरवाणेपणा आणि कमी आत्मविश्वासाला बळी पडतात. यासाठी केमिकलयुक्त हेअर डायचा वापर केला जातो, मात्र त्यामुळे केस खराब होऊ शकतात. (White Hair)

 

लहान वयात पांढरे केस करत आहेत त्रस्त
केस काळे करण्यासाठी महागड्या उत्पादनांची गरज नाही, तुम्ही नैसर्गिकरित्या पांढरे केस पुन्हा काळे करू शकता. चला जाणून घेऊया अशी कोणती गोष्ट आहे जी केसांचा काळेपणा परत आणण्यासाठी वापरली जाते.

पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी उपाय
1. मेथीदाणे (Fenugreek) रात्री पाण्याने भरलेल्या भांड्यात भिजत ठेवा, दुसर्‍या दिवशी सकाळी त्याची पेस्ट तयार करा आणि डोक्याला लावा, असे काही दिवस केल्यास केसांचा पांढरेपणा निघून जाईल. (White Hair)

2. मेथीच्या औषधी गुणधर्मांची अनेकदा चर्चा केली जाते, जर तुम्हाला तुमचे केस पुन्हा काळे करायचे असतील तर 2 चमचे मेथीचे दाणे पाण्यात उकळून थंड होऊ द्या. आता या पाण्याने केस धुवा.

3. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मेथीचा भरपूर वापर केला जातो, जर तुम्ही यासोबत गुळाचे सेवन केले तर केस पांढरे होण्याच्या समस्येपासून लवकरच सुटका मिळेल. याशिवाय केसगळती रोखण्यासाठीही मेथी खूप गुणकारी आहे.

4. मेथीदाणे बारीक करून पावडर तयार करा, आता त्यात लिंबाचा रस (Lemon Juice) मिसळून पेस्ट तयार करा.
आता ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा. यामुळे पांढर्‍या केसांची समस्या कमी वयातच दूर होईल.

5. खोबरेल तेल (Coconut Oil) त्वचा (Skin) आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते,
यासोबत मेथीदाणे बारीक करून डोक्याला लावल्यास केस पांढरे होतातच, शिवाय केस गळणे आणि कोंडाही दूर होतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- White Hair | fenugreek seeds for premature white hair problem home remedy solution coconut oil lemon juice

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | खोटे दस्तऐवज करुन कंपनीत 93 लाखांचा अपहार; पिंपरीतील घटना

 

Maharashtra Monsoon Session | MPSC आणि B.Ed CET परीक्षा एकाच दिवशी, सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा

 

Ajit Pawar | भाजपकडून अजित पवारांना घेरण्याची तयारी ? कंबोजांच्या ट्विटनंतर हालचालींना वेग, ‘ती’ केस पुन्हा ओपन होणार ?