फिफा फायनलमध्ये कोण धडकणार?

सेंट पीटर्सबर्ग : वृत्तसंस्था

फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतला पहिला मुकाबला आज रात्री साडेअकरा वाजता खेळवण्यात येत आहे. या सामन्यात बलाढ्य फ्रान्सची गाठ एडन हॅझार्डच्या बेल्जियमशी पडणार आहे. फ्रान्स आणि बेल्जियम हे या विश्वचषकातले सर्वात तुल्यबळ संघ मानले जातात. म्हणूनच फ्रान्स आणि बेल्जियम दोन्ही संघांना यंदा विश्वचषकासाठी पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे उपउपांत्यपूर्व फेरीतला हा सामना जिंकून फायनलमध्ये कोण धडक मारणार, याविषयी फुटबॉलरसिकांमध्ये खुप उत्सुकता आहे.

[amazon_link asins=’B0796XQR43′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’356b70a5-8400-11e8-bfbf-cd284faf343d’]

विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सनं उरुग्वेचा तर बेल्जियमनं ब्राझिलचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता हे दोन्ही तुल्यबळ संघ अंतिम फेरीच्या तिकीटासाठी एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत.साखळी फेरीत बेल्जियमनं  ‘ग’ गटातले तिन्ही सामने  जिंकले होते. त्यानंतर जपानविरुद्ध उपउपांत्यपूर्व सामन्यात ३-२ असा शानदार विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमनं नेमारच्या ब्राझिलचा २-० असा पराभव  केला.  त्यामुळे आता उपांत्य सामन्यात बेल्जियम समोर फ्रान्सचं आव्हान आहे.

यंदाच्या विश्वचषकात फ्रान्सचा संघ सुरुवातीपासूनच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. साखळी फेरीत ‘अ’ गटात अव्वल स्थान गाठत फ्रान्सनं बाद फेरीत प्रवेश केला. त्यानंतर २००६ नंतर पहिल्यांदाच फ्रान्स बाद फेरीतले दोन्ही सामने जिंकतचा उपांत्य फेरीत दाखल झालाय.उपउपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सनं मेसीच्या बलाढ्य अर्जेंटिनाला ४-३ अशा फरकानं हरवलं तर उपांत्यपूर्व सामन्यात सुआरेझच्या उरुग्वेचा २-० ने धुव्वा उडवला.एडन हॅझार्डचा बेल्जियमचा संघ यंदाच्या विश्वचषकातला सर्वात आवडता  संघ आहे. बेल्जियमनं आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करत विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्या वेळेस उपांत्य फेरी गाठली. तेही जपान आणि बलाढ्य ब्राझिलसारख्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून.

बेल्जियमनंही यंदाच्या विश्वचषकात दमदार कामगिरी करत पाच सामन्यांत सर्वाधिक १४  गोल केले आहेत. आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र बेल्जियमविरुद्ध केवळ पाच गोल करता आले आहेत. बेल्जियमच्या या यशाचं  श्रेय द्यावं लागेल ते प्रामुख्यानं रोमेलू लुकाकू आणि गोलरक्षक थिबो कोर्टुआला. सेंट पीटर्सबर्ग स्टेडियममध्ये रंगणारी ही उपांत्यफेरीची लढाई तितकीच तुल्यबळ होईल यात शंका नाही. त्यामुळे या सामन्यात बलाढ्या फ्रान्स बेल्जियमवर मात करुन तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठतेय, की बेल्जियमचा संघ ही लढाई जिंकून आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या दिशेने आगेकूच करतोय हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरावं.