का घ्यावा लागतीय भारतीय शिखांना दुर्बिनची मदत?

पंजाब : वृत्तसंस्था

पंजाब मधील गुरुदासपुर जवळ असणाऱ्या भारत – पाकिस्तान सिमेवर सध्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या रांगात आहे, आपले आराध्य गुरुद्वारा करतारपुर साहिब यांच्या दर्शनासाठी.

[amazon_link asins=’9386850567,8193305205′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’616016a8-ba4f-11e8-b15c-9fc5c0cb8914′]

गुरुद्वारा करतारपुर साहिब भारतापासुन जवळपास 4.5 किलोमीटर लांब पाकिस्तान मध्ये रावी नदीच्या पलीकडे आहे. शिखांसाठी पवित्र असणाऱ्या या गुरुद्वारा मध्ये दर्शन घेण्याची ईच्छा प्रत्येक शिख बांधवाची असते. पण, हे सर्वांनाच शक्य होत नाही. म्हणुनच की काय, देव BSF च्या रुपाने शिख बांधवांसाठी धावुन आला आहे.

शिख बांधवांसाठी BSF जवानांनी खास सीमेवरील चेक पोस्टवर असणाऱ्या दुर्बिन उपल्बध करुन दिल्या आहेत. त्यामुळे शिख बांधवांन मध्ये चैतन्य तसेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिख बांधव रांगा लावुन गुरुद्वारा करतारपुर साहिबच दर्शन घेत आहे.

गेल्या महिन्यात पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिध्दु यांच्या घोषणेनंतर पाकिस्तानचे सेनापती जनरल कमर जावेद बाजवा यांनी पुढच्या वर्षी गुरु नानकच्या 550 व्या जयंतीसाठी डेरा बाबा नानक ते गुरुद्वारा करतरपूर साहिब येथून मार्ग उघडण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे माहितीमंत्री फवाद अहमद चौधरी म्हणाले की इम्रान खान सरकार भारतीय शिख यात्रेकरूंसाठी करतरपूर साहिबला “व्हिसा-मुक्त थेट प्रवेश” करण्याची परवानगी देणार आहे.

बिल भरले नाही म्हणून रुग्णाची अडवणूक करणे हा गुन्हा