स्वातंत्र्य दिन विशेष ! नेमकं काय घडलं

पोलीसनामा ऑनलाईन टीम – १५ ऑगस्ट हा आपण मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी संपूर्ण देशात ध्वजावंदन करून मोठ्या थाटात आणि आनंदात हा दिवस साजरा केला जातो. आपण लहानपणापासून देश स्वातंत्र्याचा इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये वाचत आलो आहोत.परंतु १५ ऑगस्ट हाच दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून का साजरा केला जातो ? अनेकांना असा प्रश्न पडला असेल.

नेमकं काय घडलं होत देश स्वातंत्र्याच्या वेळी –
१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांनी देशाची राजवट भारतीयांच्या हाती देऊन या दिवशी देशाला स्वातंत्र केले होते. त्या वेळचे ब्रिटिश संसदचे लॉर्ड माउंटबॅटन यांनी ३० जून १९४७ रोजी भारतीय राजवट भारतीयांना सोपविण्याचे आदेश दिले होते. लॉर्ड माउंटबॅटन हे शेवटचे गव्हर्नर जनरल म्हणून काम पहात होते.
त्यांनीच भारताच्या स्वातंत्र्य दिनाची तारीख ठरविली होती. १३ ऑगस्ट रोजी भारतापासून पाकिस्तान वेगळा होणार हे निश्चित झालं होते.

जून मध्ये सुरु झालेली देश स्वातंत्र्याची प्रक्रिया लवकर संपत नव्हती कारण होत मोहम्मद अली जिना याना मुसलमानांसाठी पाकिस्तान हा स्वतंत्र देश हवा होता. अनेक बैठका केल्यानंतर सुद्धा सर्वांचे एकमत होत नव्हते आणि पैशांच्या तुटवड्यामुळे देशाची परिस्थिती लक्षात घेता तेव्हाच्या गव्हर्नर ने १५ ऑगस्ट ही तारीख भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी निश्चित केल्याचे समजते.

वेस्ट बंगालमध्ये तणावामुळे हिंसाचार वाढत होता महात्मा गांधीजी त्यावेळी तिथे होते हिंसाचार आटोक्यात येण्यासाठी देश स्वतंत्र झाल्याचे घोषित करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रेडिओ वरून भारत स्वातंत्र्य झाल्याचे घोषित केले. या बाबत इतिहासकारांची अनेक वेगवेगळी मते सुद्धा आहेत. मात्र तेव्हाचे गव्हर्नर आणि १५ ऑगस्ट या तारखेचा संबंध नाकारू शकत नाही.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...