पतीकडून बाथरूम सेक्स करण्याची जबरदस्ती, नकार दिल्यानंतर बेदम मारहाण

अहमदाबाद : वृत्तसंस्था – जबरदस्तीने बाथरूममध्ये नेऊन पत्नीच्या इच्छेविरूध्द सेक्स करणे एका पतीला चांगलेच महागात पडले आहे. पत्नीने पतीविरूध्द लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली असुन पत्नीने पतीवर जबरदस्तीने सेक्स करणे आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबामधील गोमतीनगरमध्ये राहणाऱ्या या तक्रारदार १९ वर्षीय महिलेचा सुमारे चारच महिन्यांपुर्वी भावनगर येथील एका व्यक्तीशी विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवसापासुनच सासू-सासरे तिला हुंड्यासाठी छळत होते. अनेकवेळी तिला झोपेतून उठवुन तिच्याकडे हुंड्याच्या पैशाची मागणी सासूकडून करण्यात आली. दुसरीकडे तिचा पती शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिला बाथरूममध्ये घेऊन जात आणि जबरदस्तीने सेक्स करीत होता.

एवढेच नव्हे घरात एकटी असताना तिच्या मोठ्या दीराने तिच्यावर बलात्कार करण्याचा देखील प्रयत्न केला असे महिलेचे म्हणणे आहे. पती, सासू, सासरे आणि दीराच्या त्रासाला कंटाळलेल्या पिडीत महिलेने अखेर पोलिस स्टेशन गाठले आणि चौघांविरूध्द तक्रार दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like