पत्नीला अल्लाहच्या सहाऱ्यावर सोडून जातो आहे : नवाज शरीफ भावनिक

लाहोर : वृत्तसंस्था

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. ‘पनामा गेट’ भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने शरीफ यांना दहा वर्षे, तर मरियम यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नवाज शरीफ आणि त्यांची कन्या मरियम लंडनवरून लाहोरला रवाना झाले आहेत. पाकिस्तानात पोहचता क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवाज शरीफ यांनी तीन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधानदी काम पाहिले आहे. मागील वर्षी त्यांना कोर्टाने दोषी ठरवले होते. त्यानंतर ६ जुलै रोजी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. नवाज शरीफ यांच्या पत्नी बेगम कुलसूम नवाझ आजारी आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी ईद उल फित्रनंतर बापलेक लंडनला गेले होते. त्यानंतर अबुधाबीमार्गे दोघंही लंडनहून लाहोरला परतत आहेत.

[amazon_link asins=’B0756Z242J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1d7ce17-8667-11e8-a24a-8b65a02e1a54′]

दरम्यान, नवाझ यांचे पुत्र जुनैद आणि हुसैन नवाझ यांचे पुत्र झिकेरिया यांना यूके पोलिसांनी अटक केली आहे. लंडनमध्ये अॅव्हनफील्ड अपार्टमेंटबाहेर आंदोलकांवर हल्ला केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.

पत्नीला अल्लाहच्या सहाऱ्यावर  सोडून जातो आहे

काही दिवसांपासून नवाझ यांची पत्नी आजारी असल्यामुळे लंडन येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लंडनहून पाकिस्तानात येताना “मी माझ्या पत्नीला देवाच्या सहाऱ्यावर  सोडून जात आहे ,पुढे काय होणार माहीत नाही.मला तुरुंगात टाकले जाईल  किंवा फाशी दिली जाईल याची पर्वा न करता मी पाकिस्तानात जातो आहे.” अशी भावनिक प्रतिक्रिया नवाज यांनी दिली.