CBSE Board Exam 2021 : CBSE बोर्डाच्या 10 वी, 12 वी च्या परीक्षा होतील रद्द? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाची रुग्णसंख्या दररोज सव्वा लाखांच्या वर जात आहे. अशात कोरोनचा कहर असताना ४ मे पासून होणारी CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबत अनेक प्रकारचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर बॉर्ट परीक्षा टाळण्यावरून हॅशटॅग #cancelboardexams2021, #CanclourCBSEbordexams2021 आणि #CanelBoards2021 हे अभियान चालू आहे. आता बोर्ड पारिक्षांना घेऊन CBSE ने स्पष्टीकरण दिले आहे.

एका हिंदी न्यूज चॅनलसोबत संवाद साधत असताना CBSE बोर्डाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम यांनी सांगितले की CBSE बोर्डाच्या १० वी आणि १२ वी च्या परीक्षा ठरल्या वेळेत होतील. सध्या बोर्डामार्फत परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याचा कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. कोरोनाच्या परिस्थितीत सुरक्षित वातावरणात परीक्षा घेण्यासाठी बोर्ड आणि शाळेच्या वतीने तयारी केली जात आहे. इतकेच नाही तर विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने परीक्षा घेण्याबाबत सकारात्मकता दिसून येत आहे.

पुढे ते म्हणाले की १२ वी नंतर विद्यार्थी मोठ्या संख्येने पुढील अभ्यास करण्यासाठी विदेशात जातात, याशिवाय विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा आणि IIT अथवा नीट सारख्या परीक्षांची तयारी करतात. ठरविलेल्या वेळेत विद्यार्थ्यांची परीक्षा होण्याबरोबर निकाल येणे महत्वाचे ठरते. डॉ. भारद्वाज म्हणाले की, मुलाचे जीवन आणि आरोग्याविषयी मंडळ पूर्णपणे जागरूक आणि सतर्क आहे.

ट्विटरवर सुरु असलेल्या परीक्षा थांबवण्याच्या मोहिमेच्या प्रश्नांवर डॉ. संयम म्हणाले की विरोध करणाऱ्यांची संख्या असेल, परंतू बहुतेक पालकांच्या वतीने सहमती असल्याचे दिसत आहे. तेच शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक ही या ३५ लाख मुलांच्या भविष्याबाबत गुंतलेले आहेत.